शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

स्पॅम कॉल्सच्या त्रासापासून मुक्ती; TRAI चे मोठे पाऊल, टेलिकॉम कंपन्यांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:49 IST

TRAI Action : भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी नियम अधिक कडक केले आहेत.

TRAI Action : भारतीय दूरसंचार प्राधिकरण, म्हणजेच TRAI ने स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी नियम अधिक कडक केले आहेत. नवीन नियमानुसार, 10 क्रमांकांचा गैरवापर थांबेल आणि टेलीमार्केट्सना नवीन नंबर सीरिजचे पालन करावे लागेल. याशिवाय, तुम्ही स्पॅम कॉल्स आल्यानंतर सहजपणे तक्रार करू शकाल, ज्यावर दंडात्मक कारवाईदेखील केली जाईल. याबाबत ट्रायने एक्स प्लॅटफॉर्मवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून माहिती दिली आहे.

ग्राहक संरक्षण सुधारण्यासाठी TRAI ने टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन (TCCCPR), 2018 मध्ये सुधारणा केली आहे. यानुसार, ग्राहक 10 क्रमांकावरुन येणाऱ्या टेलीमार्केटिंग कॉलपासून मुक्त होऊ शकतील आणि रिपोर्टिंग प्रक्रिया देखील सुलभ करण्यास सांगितले आहे. यात टेलिकॉम कंपन्यांवर दंडात्मक कारवाईचा उल्लेख करण्यात आला असून, कंपन्यांनी मात्र या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.

नवीन नंबर सिरीजचा वापर TRAI ने कमर्शियल कम्युनिकेशनसाठी 10 नंबरचे मोबाईल नंबर आधीच ब्लॉक केले आहेत. यासाठी 140 आणि 1600 मालिकेपासून नवीन क्रमांकाची मालिका सुरू करण्यात येणार आहे. 140 क्रमांकाची सिरीज प्रमोशनल कॉलसाठी वापरावी लागेल, तर 1600 क्रमांकाची सिरीज व्यवहाराशी संबंधित कॉलसाठी वापरावी लागेल.

नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटरवर कारवाईट्रायच्या नव्या निर्णयानंतर अनोंदणीकृत टेलिमार्केटर्सवर आळा घालण्यासाठी दंड आकारण्यात येणार आहे. जर टेलीमार्केटरने पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केले तर 15 दिवसांसाठी निलंबन केले जाईल, तर पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास टेलिकॉम संसाधन 1 वर्षासाठी डिस्कनेक्ट केले जाऊ शकते.

दूरसंचार कंपन्यांनाही दंड टेलिकॉम ऑपरेटरनाही दंडाला सामोरे जावे लागू शकते. या दंडाची सुरुवातीची रक्कम 2 लाख रुपये असेल, जी 5 लाखांपर्यंत जाऊ शकते. चूक पुन्हा आढळल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दरम्यान, दूरसंचार कंपन्यांची संघटना असलेल्या COAI ने दूरसंचार कंपन्यांवरील दंड वाढवण्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. 

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन