शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तुमचा पर्सनल डेटा प्रत्येक वेबसाइटपासून सुरक्षित ठेवायचाय? करा फक्त हे काम, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 15:30 IST

सध्याच युग म्हणजे डिजिटल युग. सर्वच जण इंटरनेट वापरतात. यात सोशल मीडियावर तर प्रत्येकाचे अकाउंट आहे. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो.

सध्याच युग म्हणजे डिजिटल युग. सर्वच जण इंटरनेट वापरतात. यात सोशल मीडियावर तर प्रत्येकाचे अकाउंट आहे. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. पण जेवढ्या उपयोगाचे हे माध्यम आहे तेवढ्याच यावर फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. आपली वैयक्तीक माहिती यावरुन चोरल्याचे समोर आले आहे. यातून बँकेतील पैसे काढले जात आहेत. तर आपल्या माहितीचा गैरवापरही होत आहे.तर तुम्हाला तुमची वैयक्तीक माहिती कुणाला द्यायची नसेल तर यासाठी काही ट्रीक आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्यास फसवणुकीपासून वाचू शकता. चला जाणून घेऊया ट्रीक. 

इंटरनेटने संपूर्ण जगाला जवळ आणले आहे. आपण सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर करतो, पण या पोस्ट आपल्यासाठी तोट्याच्या ठरु शकतात. काही फेकवेबसाईट याचा गैरफायदा घेतात. आपल्याला इंटरनेट वापरत असताना ब्राउंझिंगचा वापर करावा लागतो, ते करण्यापूर्वी तुम्हाला ब्राउझिंगमध्ये सेटींग करावी लागणार आहे. ही सेटींग केली तर तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता. 

Twitter Edit Button Update: मस्तच! फेसबुक पोस्टसारखंच आता ट्विटही 'एडिट' करता येणार; फक्त...

संगणक, लॅपटॉप किंवा मोबाइलवर ब्राउझर वापरून वापरकर्ते वेबसाइटला वैयक्तिक डेटा पाहण्यापासून ब्लॉक करू शकतात. यासाठी तुम्हाला डोन्ट ट्रॅक रिक्वेस्ट पाठवावी लागेल. ही रिक्वेस्ट वेब ब्राउझरमध्ये डीफॉल्टनुसार बंद आहे. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन ते चालू करावे लागेल. 

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरून तु्म्ही Do not track रिक्वेस्ट अशी करु शकता. यात  Google Chrome वेब ब्राउझर सुरु करा. आता थ्री डॉट पर्यायावर जा. तुम्हाला ते स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसेल. यात एक ड्रॉप-डाउन मेनू दिसेल. येथून सेटिंग्ज पर्याय निवडा. आता “Privacy and security settings" पर्याय शोधा आणि  “Cookies and other site data” वर क्लिक करा. पुढ तुम्ही Send a “Do Not Track” request with your browsing traffic विनंती पाठवा यासह ते चालू किंवा बंद करू शकता.

Android फोनवरूनही Do not track पाठवता येते. फोनवर Google Chrome वेब ब्राउझर उघडा. स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या थ्री डॉट पर्यायावर क्लिक करा. आता Settings पर्याय निवडा. मेनू मेनूमध्ये  “Privacy and security settings" पर्याय निवडा. आता "Do Not Track" पर्यायावर क्लिक करा आणि सेटिंग चालू करा.

डू नॉट ट्रॅक चालू केल्यानंतरही काही वेबसाइट तुमच्या वैयक्तिक डेटावर लक्ष ठेवू शकतात हे वापरकर्त्यांनी लक्षात ठेवावे. माहिती, सेवा, जाहिराती आणि सूचना या गोष्टी देण्यासाठी तुमचा ब्राउझिंग डेटा वापरू शकतात. डू नॉट ट्रॅक रिक्वेस्ट मिळूनही Google सह बर्‍याच वेबसाइट्स असे करणे सुरू ठेवतात, त्यामुळे तुम्ही ही सेटींग पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगलMobileमोबाइल