शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

टेकफेस्टमध्ये रंगणार काउंटर स्ट्राइकसह पबजीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 06:07 IST

करिअरसाठी मिळालेली उत्तम संधी म्हणून स्पर्धेकडे पाहा; तंत्रवेड्या तरुणाईला आयआयटी मुंबईचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पबजी म्हटले की हल्ली केवळ तरुणाईला अ‍ॅडिक्ट करणारा गेम अशीच याची जगभर ओळख झाली आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अ‍ॅक्शनमुळे तरुणाईला या गेमची भुरळ पडली आहे. मात्र केवळ गेमिंगच्या पलीकडे जाऊन यामध्ये करिअर संधी आणि पैसे कमावण्याची संधी असा पर्यायही यामधून उपलब्ध होतो याची जाणीव तरुणाईला करून देण्यासाठी यंदा आयआयटीच्या टेकफेस्ट आयोजकांनीच थेट याची स्पर्धा टेकवेड्या तरुणांसाठी आयोजित केली आहे. त्यामुळे यंदाच्या टेकफेस्टमध्ये काउंटर स्ट्राइकसह पबजीचा थरार पाहायला मिळेल.स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि पबजीसारख्या गेमिंग अ‍ॅपमधूनही करिअर संधी हा मेळ साधण्याचा प्रयत्न टेकफेस्टचा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.आशियातील सर्वांत मोठा विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत होणार आहे. यंदाचा टेकफेस्ट तरुणाईसाठी अधिक जवळचा ठरणार आहे; कारण या फेस्टच्या ‘गेमर्स लीग’मध्ये लोकप्रिय ‘पबजी’बरोबरच गेल्या काही वर्षांपासून सीएस गो (काउंटर स्ट्राइक) खेळणाऱ्यांचा सामना रंगणार आहे. दोन्ही खेळांतील विजेत्यांना दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार असून हे खेळ खेळणारे कुणीही संघ यात सहभागी होऊ शकतील. आतापर्यंत प्रत्येकी ४ जणांच्या २५६ टीम्सने या पबजी मोबाइल ई-स्पोटर््स कॉम्पिटिशनमध्ये नोंदणी केल्याची माहिती आयोजकांनी दिली.सुरुवातीला पबजीसाठी नोंदणी करणाºया संघांचे आपापसांत सामने झाले. त्यानंतर आता त्यातील सर्वोत्तम १६ संघांचे ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत टेकफेस्टमध्ये सामने होणार आहेत.देशांत विशेषत: बाहेरच्या देशांतही तरुणाईला या गेम्सने भुरळ पाडली आहे; मात्र या गेम्सकडे इतर देशांतील तरुणाई करिअरची उत्तम संधी म्हणून पाहत त्याचा वापर करीत आहे. तोच धडा येथील तंत्रवेड्या तरुणाईने गिरवून करिअरचा एक उत्तम पर्याय म्हणून या गेम्सकडे पाहावे हा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे ई-स्पोर्ट्स विभागाचे प्रमुख प्रतीक मोहनानी यांनी स्पष्ट केले.असे आहेत स्पर्धेमध्ये खेळवण्यात येणारे गेमच्‘प्लेअर अननोन बॅटलग्राउंड्स’ म्हणजेच पबजी हा खेळ दक्षिण कोरियाई व्हिडीओ गेम कंपनीने तयार केला आहे. ‘बॅटल रॉयल’ या २००० साली गाजलेल्या जपानी चित्रपटापासून प्रेरणा घेऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे.च्‘काउंटर-स्ट्राइक : ग्लोबल आॅफेंसिव’ म्हणजेच ‘सीएस गो’ या खेळात दहशतवादविरोधी, दहशतवादी, असे दोन गट असतात. दहशतवाद्यांनी ठेवलेले बॉम्ब निकामी करणे, ओलीस ठेवलेल्या माणसांना सोडवणे असे कार्य दहशतवाद विरोधकांना या खेळात करायचे असते. हे दोन्ही गेम स्पर्धेत आहेत.