शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

Smart TV खरेदी करायचा विचार करताय? थोडं थांबा...रेडमीचा परवडेल असा टारझन टीव्ही येतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 13:03 IST

Redmi Smart TV Tarzan: लिस्टिंगनुसार हा टीव्ही Xiaomi च्या Redmi ब्रँड अंतर्गत लाँच केला जाणार आहे. तसेच या टीव्हीमध्ये Android TV 10 देण्यात येणार आहे. कंपीनीने अद्याप या स्मार्ट टीव्हीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनीने नुकतीच चीनमध्ये Mi TV P1 series बाजारात आणली आहे. 

घरात किंवा ऑफिसमध्ये स्मार्ट टीव्ही (Smart TV) घेण्याच्या विचारात असाल तर थोडे थांबावे लागेल. बाजारात नवनवीन मॉडेल येणार आहेत. यापैकीच एक असलेला Redmi Smart TV Tarzan येत आहे. एका टिपस्टरने गुगल प्ले कंसोल आणि शाओमीच्या नवीन रेडमी स्मार्ट टीव्हीसाठी गुगल सपोर्टेड डिव्हाईस लिस्ट शेअर केली आहे. यामध्ये मॉडेल नंबर MiTV-M00Q3 असल्याचे दिसत आहे. (Redmi Smart TV Tarzan will come soon in Market. )

लिस्टिंगनुसार हा टीव्ही Xiaomi च्या Redmi ब्रँड अंतर्गत लाँच केला जाणार आहे. तसेच या टीव्हीमध्ये Android TV 10 देण्यात येणार आहे. कंपीनीने अद्याप या स्मार्ट टीव्हीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनीने नुकतीच चीनमध्ये Mi TV P1 series बाजारात आणली आहे. 

टिपस्टर मुकुल शर्मा याने ही माहिती दिली आहे. 2 जीबी रॅम, एक मीडियाटेक टी31 क्वाड-कोर प्रोसेसर, Mali G52 GPU आणि फुल-एचडी 1,920x1,080 पिक्सल रिझॉल्यूशन असणारा डिस्प्ले मिळेल. कंपनीकडून टीव्हीची स्क्रीनची साईज, किंमत, स्पेसिफिकेशनबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही. हा टीव्ही भारतात केव्हा उपलब्ध होईल याची माहिती नाही. मात्र, या स्पेसिफिकेशनच्या आधारावर हा टीव्ही बजेट फ्रेंडली असू शकतो.

भारीच! व्हिडीओ कॉलिंगची सोय असलेला भारतातील पहिला अँड्रॉईड TV लाँच; जाणून घ्या किंमत अन् फीचर्सजागतिक टीव्ही इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनी टीसीएलने (TCL) व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असणारा भारतातील पहिला अँड्रॉईड ११ टीव्ही लाँच केला आहे. ही पी७२५ आणि ९८.६६% पेक्षा जास्त बॅक्टेरीया नष्ट करू शकणारी हाय एंड हेल्दी स्मार्ट एसीची ओकॅरीना सीरीज आहे. पी७२५ हा पहिला ४के एचडीआर टीव्ही असून तो अँड्रॉईड ११ वर चालतो, यात व्हिडीओ कॉलची सुविधा असून, डॉल्बी व्हिजनचे अल्ट्रा व्हिव्हिड कलर्स एमईएमसी, डॉल्बी व्हिजन व अ‍ॅटमॉस, हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल २.०, स्पीड आणि सिक्युरिटी अपडेट्स इत्यादी आधुनिक सुविधांचा समावेश आहे. या टीव्हीत ७०००+ अ‍ॅप्स आणि ७००,०००+ शो/ फिल्म एकाचवेळी अ‍ॅक्सेस करता येतील. 

व्हिडीओ कॉल कॅमेरा आपल्याला सहजपणे प्लग इन आणि प्ले करता येतो. गुगल ड्युओचा वापर करून मित्र व कुटुंबासह व्हिडीओ चॅट करण्यासह, ऑनलाईन वर्गात सहभागी होणे, घरातूनच आरामात ऑफिससोबत कनेक्ट होणे सहज शक्य होते. पी७२५ चे डॉल्बी व्हिजन हे आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान असून ते अविश्वसनीय ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, कलर आणि डिटेलसह अल्ट्रा-व्हिव्हिड पिक्चर क्वालिटी प्रदान करण्यासाठी वाइड कलर गॅमट क्षमतांसह हाय डायनॅमिक रेंज (एचडीआर) ला जोडते. डॉल्बी व्हिजनसह डिस्प्ले अधिक व्हिव्हिड, वास्तविक पिक्चर दाखवतो. शार्प कॉन्ट्रास्ट, ट्रू ब्लॅक व शॅडो डिटेल्सची संगती सखोल दिसून येते. अ‍ॅमेझॉनवर हा टीव्ही ४३", ५०", ५५" आणि ६५" प्रकारात अनुक्रमे ४१,९९०, ५६,९९०, ६२,९९० आणि ८९,९९० रुपये किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :xiaomiशाओमी