जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपन्या कोणत्या असे जर कोणालाही विचारले तर कोणी अॅपल म्हणले, कोणी व्हिवो तर कोणी सॅमसंग सांगेल. परंतू, पाकिस्तानात एका वेगळ्याच कंपनीची चलती असते. तुम्ही या कंपनीचे नावही ऐकले नसेल अशी ही कंपनी आहे जिची विक्री वर्षाला काही कोटी युनिट एवढी आहे.
भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन हे Vivo, Samsung, Oppo, Xiaomi, Apple सारख्या ब्रँडचे आहेत. तसेच जगातही आहेत. पण या पाकिस्तानात काहीतरी वेगळेच सुरु असते. पाकिस्तानात अशी एक कंपनी आहे जिने सर्व मोठ्या चिनी ब्रँडना मागे टाकले आहे.
पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए) ने पाकिस्तानातील स्मार्टफोन खपाचे आकडे जाहीर केले आहेत. यामध्ये व्हीजीओ टेल ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानमध्ये स्थानिक मोबाइल फोन असेंब्लीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पाकिस्तानला भविष्यात काही त्यांना करायला जमले तर मोबाईल निर्यात करणारा देश म्हणून देखील पाहिले जात आहे.
व्हीजीओ टेल कंपनीने जुलैमध्ये २.१२ दशलक्ष युनिट्स बनवले आहेत. दुसरा क्रमांक इन्फिनिक्सचा (२.०१ दशलक्ष युनिट्स) लागत आहे. जी भारतातही आहे. तिसरा क्रमांक हा आयटेलचा लागत असून तिने १.५३ दशलक्ष युनिट्स बनविले आहेत. व्हिवो १.३८ दशलक्षसह चौथ्या क्रमांकावर आहे, शाओमी पाचव्या तर सॅमसंग सहाव्या क्रमांकावर आहे. टेकनो सातव्या क्रमांकावर असून क्यू मोबाइल आठव्या तर जी'फाइव्ह नवव्या क्रमांकावर आहे. नाही म्हणायला नोकियाला पाकिस्तानने अद्याप सोडलेले नाही. नोकिया ही कंपनी दहाव्या क्रमांकावर आहे.