शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'या' पाच वैशिष्ट्यांमुळे Jio Phone 2 आहे इतर फोनपेक्षा खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 16:10 IST

Jio Phone 2 हा इतर फोनपेक्षा खास असल्यामुळे या फोनची पाच वैशिष्ट्ये जाणून घेऊया. 

नवी दिल्ली - रिलायन्सच्या 'जिओ फोन'ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर Jio Phone 2 हा फोन लॉन्च करण्यात आला होता. 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या फ्लॅश सेलमध्ये Jio Phone 2 च्या सर्व स्टॉकची विक्री अवघ्या काही मिनिटातच झाली. Jio Phone 2 हा इतर फोनपेक्षा खास असल्यामुळे या फोनची पाच वैशिष्ट्ये जाणून घेऊया. 

व्हिडीओ कॉलिंग

Jio Phone 2  हा एक फिचर फोन असून देखील यामध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. बाजारात असलेल्या कमी किंमतीतील फिचर फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग फिचरचा पर्याय उपलब्ध नसतो. भारतातील अनेक जण हे साध्या फोनपेक्षा स्मार्टफोनचा वापर अधिक करतात. तसेच हल्ली व्हिडीओ कॉलिंग फिचरचा वापरही मोठ्याप्रमाणात केला जातो. त्यामुळेच Jio Phone 2 मध्ये असलेली व्हिडीओ कॉलिंगची सुविधा हे या फोनच एक खास वैशिष्ट्य आहे. 

मनोरंजन 

Jio Phone 2 मध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठीही खास तरतूद करण्यात आली आहे. या फोनच्या माध्यमातून जिओचे एंटरटेन्मेंट अॅपचा वापर युजर्स करू शकतात. यामध्ये युजर्सला जिओ म्युझिक, जिओ टीव्ही, जिओ सिनेमासारखे मनोरंजनाचे अॅप वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिओने दिलेलं हे फिचर इतर कोणत्याही फिचर फोनमध्ये नाही.

व्हॉईस असिस्टंट 

गूगलने सर्वप्रथम व्हॉईस असिस्टंटचा पर्याय हा जिओ फोनमध्येच दिला आहे. Jio Phone 2 मध्ये ही सुविधा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. गूगलच्या व्हॉईस असिस्टंटच्या सुविधेमध्ये कोणतेही शब्द टाईप न करता केवळ बोलून फोन तुम्ही दिलेल्या आदेशाचं पालन करतो. 

व्हॉटस्अॅप, फेसबुक, यूट्यूब

सोशल मीडियावर अनेक जण खूप वेळ घालवत असतात. व्हॉटस्अॅप, फेसबुक, यूट्यूबसारखे अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. Jio Phone 2 मध्ये हे तिन्ही अॅप वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत Jio Phone 2  किंमत ही अत्यंत कमी आहे. केवल 2,999 रुपयांना हा फोन उपलब्ध आहे. 

स्वस्त 4G प्लॅन 

रिलायन्स जिओ देशात सर्वात स्वस्त 4G इंटरनेट डेटा प्लान लॉन्च केला आहे. सर्वात स्वस्त 4G प्लॅन इतर कोणतीही कंपनी देत नसल्याने सध्या जिओला जास्तीची मागणी आहे. कंपनीच्या ऑफरमध्ये तुम्ही जुना फिचर फोन दिल्यास नवा Jio Phone 2  हा केवळ 501 रुपयात मिळणार आहे.

टॅग्स :Jioजिओ