शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Blackberry सारखी झाली अवस्था; स्मार्टफोन बाजारातून 'या' दिग्गज कंपनीची एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:08 IST

कंपनी यापुढे कोणताही नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार नाही.

कधीकाळी फिचर/स्मार्टफोन मार्केवर नोकिया आणि ब्लॅकबेरीचे राज्य असायचे. मात्र, हळुहळू दोन्ही कंपन्या मार्केटमधून गायब झाल्या. अशाच प्रकारे अनेक स्मार्टफोन ब्रँड्स आले अन् गेलेही...आता आणखी एका कंपनीने या क्षेत्रातून माघार घेतली आहे. Asus ने स्मार्टफोन व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्पष्ट केले की, 2026 मध्ये कोणताही नवा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार नाही. पुढील काळात Asus चे लक्ष पीसी, लॅपटॉप्स आणि AI आधारित डिव्हाइसेसवर राहणार आहे.

बाजारातील बदल आणि वाढती स्पर्धा

चिनी ब्रँड्सकडून वाढती स्पर्धा आणि बदलते मार्केट डायनॅमिक्स, यामुळे Asus ला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. काही वर्षांपूर्वी LG नेही स्मार्टफोन बाजारातून माघार घेतली होती. मात्र, Asus ची परिस्थिती LG पेक्षा वेगळी आहे. कारण, Asus ने नवकल्पनांमध्ये सातत्याने धोके पत्करले होते. आता Asus ची ही एक्झिट अनेकांना BlackBerry च्या बाजारातून बाहेर पडण्याची आठवण करून देणारी आहे. दोन्ही ब्रँड्सचा एक वेगळा, निष्ठावंत ग्राहकवर्ग होता.

अध्यक्षांचा दुजोरा; शेवटचे फोन कोणते?

Asus चे अध्यक्ष Johnny Shih यांनी कंपनी पुढे नवे स्मार्टफोन लॉन्च करणार नसल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने ROG Phone 9 FE आणि Zenfone 12 Ultra हे दोन फोन सादर केले होते. भारतात मात्र Zenfone मालिकेचे लॉन्चिंग याआधीच थांबले होते.

Asus स्मार्टफोन का चालले नाही?

1) ‘गेमिंग-ओन्ली’ ची मर्यादा

ROG फोन प्रामुख्याने गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आले. यात दमदार प्रोसेसर, हाय रिफ्रेश-रेट डिस्प्ले, मोठी बॅटरी मिळायची. पण गेल्या काही वर्षांत मिड-रेंज फोनही सहज गेमिंग हाताळू लागले. त्यामुळे केवळ गेमिंगसाठी स्वतंत्र फोन घेण्याची गरज कमी झाली.

2) स्पर्धकांची बहुपयोगी ऑफर

iQOO सारख्या ब्रँड्सनी गेमिंग परफॉर्मन्ससोबत चांगले कॅमेरे आणि सामान्य डिझाइन दिले, यामुळे Asus च्या गेमिंग पोझिशनिंगवर परिणाम झाला.

3) वेळेआधीची नवकल्पना

कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आणणारा Asus पहिला अँड्रॉइड प्लेअर ठरला. रिव्ह्यूअर्सनी प्रशंसा केली, पण ग्राहकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. योग्य बाजारपेठ आणि योग्य वेळ, हा ताळमेळ साधता आला नाही.

पुढचा फोकस: पीसी, AI आणि ‘फिजिकल AI’

स्मार्टफोनमधून बाहेर पडत असला तरी Asus लॅपटॉप्स आणि पीसी सेगमेंटमध्ये मोठे नाव आहे. पुढील काळात कंपनी PCs, AI सर्व्हर्स आणि फिजिकल AI (रोबोटिक्स, स्मार्ट ग्लासेस) यांवर भर देणार आहे. विद्यमान स्मार्टफोन युजर्ससाठी मेंटेनन्स, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सर्व्हिस सपोर्ट सुरू राहील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे Asus चा AI सर्व्हर व्यवसाय वेगाने वाढत असून, गेल्या वर्षी या विभागात 100% वाढ नोंदवली गेली. त्यामुळे कंपनीने तुलनेने सुरक्षित आणि भविष्योन्मुख मार्ग निवडल्याचे दिसते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Asus exits smartphone market, reminiscent of Blackberry's fate.

Web Summary : Asus exits the smartphone business by 2026, focusing on PCs and AI. Rising competition from Chinese brands and changing market dynamics led to this decision. Existing smartphone users will continue receiving support and updates.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAsus Phoneअसूस मोबाइल