शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

रोबोटला लागतील धापा, गळतील घामाच्या धारा! नवे संशोधन, मानवी त्वचेचे ३५ थर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 10:08 IST

 सध्या रोबोट्स विविध क्षेत्रांत सुरक्षिततेसाठी आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्याचीही कामे करत आहे.

नवी दिल्ली :  सध्या रोबोट्स विविध क्षेत्रांत सुरक्षिततेसाठी आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्याचीही कामे करत आहे. आता आणखी एक नवीन रोबो तयार करण्यात आला असून, तो माणसासारखा श्वास तर घेतोच शिवाय काम केल्यानंतर घामही गाळतो. त्याला कडकडून थंडीही जाणवते. थर्मेट्रिक्सने या रोबोटला ‘स्वेटी रोबोट’ असे नाव दिले आहे.

या थर्मल रोबोटमध्ये अशी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, ज्यामुळे तो मानवासारखा वाटतो. रोबोटमध्ये त्वचेचे ३५ थर दिले आहेत.

लहान मुलांसाठीही काय फायदा?

संशोधक लवकरच या रोबोटच्या मदतीने तापमानाचा विविध वयोगटांवर होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

nफर्मने या मॉडेलवर आधारित काही छोटे रोबोट्सही बनवले आहेत. त्यांना ‘स्वेटी बेबी’ असे नाव देण्यात आले आहे. हे विशेषतः लहान मुलांची आरोग्य स्थिती समजून घेण्यास मदत करेल.

रोबोटची काय मदत? 

अतिउष्णतेचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी हा रोबोट तयार करण्यात आला आहे. 

या प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या स्कूल फॉर इंजिनीअरिंग ऑफ मॅटर (ट्रान्सपोर्ट अँड एनर्जी) मधील सहयोगी प्राध्यापक कोनराड रिक्झेव्स्की यांनी सांगितले की रोबोट थंड असताना थरथर कापतो आणि कठोर परिश्रम करत असताना घाम गाळतो. म्हणजे भावना सोडल्या तर तो माणसासारखा दिसेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानRobotरोबोट