शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

टेलिग्रामने आणले ‘हे’ नवीन फिचर; व्हाट्सअ‍ॅप सोबतच झूमच्या अडचणी वाढल्या 

By सिद्धेश जाधव | Updated: June 28, 2021 18:12 IST

Telegram Group Video Calling: टेलिग्राम एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप म्हणून आपले स्थान निर्माण करू पाहत आहे, यासाठी कंपनीने ग्रुप व्हिडीओ कॉलचे फिचर लाँच केले आहे.  

Telegram कडे WhatsApp चा पर्याय म्हणून बघितले जाते. आपली प्रसिद्धी वाढवण्यासाठी टेलिग्रामने महामारीच्या काळात व्हिडीओ कॉलिंगची सुरुवात केली होती. आता टेलिग्रामने व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप्सना टक्कर देण्यासाठी कंबर बांधली आहे. कंपनीने ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर उपलब्ध केले आहे, इतकेच नव्हे तर यात स्क्रीन शेयरिंगचे फिचर देखील देण्यात आले आहे. हा अपडेट मोबाईल, डेस्कटॉप आणि टॅबलेट अ‍ॅप्सवर उपलब्ध झाला आहे.  

युजर्स आता एखाद्या ग्रुप व्हॉइस कॉलला ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये फक्त एका क्लिकने रूपांतरित करू शकतात. यासाठी फक्त कॅमेरा आयकॉनवर टॅप करावे लागेल. ग्रुप व्हॉइस कॉल्समध्ये सहभागी होणाऱ्या युजर्सना कोणतीही मर्यादा नाही. परंतु फक्त 30 युजर्सना ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होता येईल. लवकरच ही मर्यादा वाढविण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.  

ग्रुप अ‍ॅडमिन्स एखाद्या युजरची व्हिडीओ फीड ग्रुपमध्ये पिन करून ठेऊ शकतात. हे फिचर मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीसाठी उपलब्ध झाले आहे. युजर इतर युजर्सच्या स्क्रीनवर क्लिक करून ती मोठी करू शकतात.  

टेलिग्रामने या फिचरमध्ये शेयर स्क्रीनची भर टाकली आहे. युजर तीन डॉट मेनूवर क्लिक करून आपल्या स्मार्टफोन किंवा टॅबवरून स्क्रीन शेयरिंग सुरु करू शकतात. डेस्कटॉपवर स्क्रीन शेयर करत असलेल्या युजरची स्क्रीन पिन होते. या फिचरमुळे टेलिग्रामचा ग्रुप व्हिडीओ कॉलिंग अनुभव झूम आणि गुगल मीट सारखा वाटतो.  

टॅग्स :Androidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप