शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

जाम भारी क्रिएटीव्हिटी!! मोटोरोलाचा नवा अविष्कार; हवा तेव्हा स्मार्टफोन, हवं तेव्हा घड्याळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 16:32 IST

मोटोरोला लवकरच युजर्ससाठी एक भन्नाट स्मार्टफोन लाँच करणार

Motorola Band Smartphone : चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola नेहमी आपल्या नावीन्यतेसाठी ओळखली जाते. मोटोरोलाने आपल्या युजर्ससाठी एक नवीन डिव्हाइस सादर करण्याची तयारी करत आहे. अलीकडेच असे समोर आले आहे की मोटोरोला एक नवीन बँड फोन लॉन्च करणार आहे, जो तुम्हाला स्मार्टफोनसारखा वापरता येईल, त्यासोबतच तुमच्या मनगटाभोवतीही गुंडाळता येईल. मोटोरोला ने त्याच्या Lenovo Tech World इव्हेंटमध्ये नवीन स्मार्टफोनचा प्रोटोटाइप लाँच केला आहे. हा नवीन बँड फोन शोकेस पीस आहे करतो. या प्रोटोटाइपने या आगामी उपकरणाचा डिस्प्ले लवचिक (flexible) असल्याचे दाखवले आहे. हे उपकरण इतके लवचिक आहे की तुम्ही ते तुमच्या मनगटावर ते बँडप्रमाणे घालू शकता. मात्र, हे डिव्हाईस कधी लॉन्च होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

2016 मध्ये पहिल्यांदा ही संकल्पना-

कंपनीने सर्वप्रथम हा 2016 मध्ये असा प्रकार सादर केला होता, ज्याला wrist phone म्हणतात. त्यानंतर कंपनीने या उपकरणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण आता तब्बल सात वर्षांनंतर त्यांनी पुन्हा या उपकरणाबद्दल बोलण्यास सुरूवात केली आहे.

बँड फोनची विशेष वैशिष्ट्ये-

  • या फोनच्या डिस्प्लेबाबत काही माहिती समोर आली आहे. असे दिसून येते की जेव्हा तुम्ही हे डिव्हाइस सरळ धरून ठेवता तेव्हा त्याचा डिस्प्ले 6.9 इंच असतो. जर तुम्ही ते फोल्ड केले तर त्याचा आकार 4.9 इंच एवढा होतो.
  • डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला फोनच्या मागील बाजूस एक कापडासारखा प्रकार असतो, ज्यामुळे तो सहज बँड म्हणून वापरता येतो.
  • कंपनी यातून तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचे ओळख करून देणार आहे.
  • कंपनीचा नवीन फोन फोल्ड करण्यायोग्य आणि रोल करण्यायोग्य असून तशा परिस्थितीतही चांगले काम करून शकेल.
  • त्याच्या मदतीने कंपनी आपल्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देऊ शकेल. आता कंपनी हा फोन कधी बाजारात आणते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान