शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोबाईल नेटवर्कशिवाय आता करा इंटरनेट कॉल, बीएसएनएलची नवी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 10:57 IST

भारत दूरसंचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)नं ग्राहकांना एक नवी योजना उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देरत दूरसंचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)नं एक नवी शक्कल लढवली आहे. बीएसएनएलचं नेटवर्क बऱ्याच ठिकाणी खराब आहे, तर काही भागात बीएसएनएलचं नेटवर्कच नाही.बीएसएनएलनं खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेल्या भागासाठी Wings Application हे अ‍ॅप लाँच केलं आहे.

 नवी दिल्ली: भारत दूरसंचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)नं एक नवी शक्कल लढवली आहे. बीएसएनएलचं नेटवर्क बऱ्याच ठिकाणी खराब आहे, तर काही भागात बीएसएनएलचं नेटवर्कच नाही. अशा परिस्थितीतही आपल्याला बीएसएनएलवरून इंटरनेट कॉल करता येणार आहे. बीएसएनएलनं खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेल्या भागासाठी Wings Application हे अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीनं यूजर्स नेटवर्क नसतानाही इंटरनेट कॉल करू शकणार आहेत. त्यासाठी या अ‍ॅप्ससह वायफायचा वापर करता येणार आहे.  बीएसएनएलचं हे विंग्स अ‍ॅप्स वापरण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बीएसएनएलच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. युजर्सला स्वतःच्या ओळखपत्राच्या पुराव्यांसह पत्ता आणि फोटो देऊन या सेवेसाठी नोंदणीकृत व्हावे करावे लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर युजर्सला Wings Pin पाठवण्यात येणार आहे. युजर्सला गुगल प्ले स्टोअरवरून विंग्स अ‍ॅप डाऊनलोड अन्  इन्स्टॉल केल्यानंतर विंग्स पिन जमा करावा लागणार आहे.युजर्सला VoIP (Voice over Internet Protocol)ची उत्तम दर्जाची सुविधा मिळावी, यासाठीच हे अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. जिथे मोबाइल नेटवर्क नसेल तिथूनही आपण विंग्स अ‍ॅपच्या मदतीनं कॉल करू शकणार आहात. इमारतीच्या बेसमेंट(तळाला)मध्ये गेल्यास बऱ्याचदा नेटवर्क मिळत नाही. अशातच या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण कोणालाही इंटरनेट कॉल करू शकता. याचा फायदा 2G, 3G, 4G सेल्युलर नेटवर्कशिवाय वायफाय वापरकर्त्यांनाही होणार आहे.  कसं सुरू कराल BSNL VoIP सर्व्हिस ?सर्वात आधी प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल, त्यानंतर 1,099 रुपये भरावे लागतील. पेमेंट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर विंग्स अ‍ॅप एक वर्षासाठी एक्टिवेट करण्यात आलं आहे. या अ‍ॅपशिवाय युजर्सला एसआयपी(Session Initiation Protocol)ही डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर 10 डिजिटला एक सब्सक्रिप्शन आयडी उपलब्ध करून दिला जाणार आहे. नोंदणीकृत मेलआयडीवरून 16 डिजिटचा पिन पाठवावा लागेल. हे पिन एंटर केल्यानंतर युजर्स Wings सर्व्हिसचा वापर करता येणार आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएल