शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लै भारी! गुगल करणार मोठा बदल; Gmail वरून करता येणार थेट कॉल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 19:12 IST

Direct Calling कॉलिंग फिचर सर्वप्रथम Gmail अ‍ॅपमध्ये येणार आहे. या फिचरमुळे कोणत्याही युआरएलविना तुमच्या सहकाऱ्याला तुम्ही कॉल करू शकता.

गुगल मीटमध्ये थेट कॉल करणे सोप्पे होणार आहे. झूम, गुगल मीट आणि इतर अ‍ॅप्समध्ये व्हिडीओ कॉल करण्यासाठी एक युआरएल जेनरेट करावी लागते. ग्रुप कॉल्स आणि मिटींग्ससाठी ही पद्धत योग्य ठरते. परंतु जेव्हा फक्त दोन व्यक्तींना संवाद साधायचा असतो तेव्हा ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची वाटते. आता लवकरच गुगल मीटवरून कॉल करण्याची पद्धत बदलणार आहे. मीटिंग क्रिएट करून त्यानंतर युआरएल जेनरेट करण्याची पद्धत बंद केली जाणार आहे.  

Direct Calling कॉलिंग फिचर सर्वप्रथम Gmail अ‍ॅपमध्ये येणार आहे. या फिचरमुळे कोणत्याही युआरएलविना तुमच्या सहकाऱ्याला तुम्ही कॉल करू शकता. डायरेक्ट कॉलची माहिती फोन आणि जीमेल लॉगिन असलेल्या वेब ब्राउजरवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून देण्यात येईल.  

या फिचरसह गुगल Companion mode वर देखील काम करत आहे.  ज्यात गुगल मीटमधील सहभागी लोक लॅपटॉपचा वापर सेकंड स्क्रीन प्रमाणे करू शकतील. हे फिचर नोव्हेंबरमध्ये युजर्सच्या भेटीला येईल. तसेच लाईव्ह ट्रान्स्लेटड कॅप्शन फिचर देखील या वर्षाच्या अखेर मिळेल. ज्यात इंग्रजी मधून फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज अश्या भाषांमध्ये भाषांतर मिटिंगमध्ये बघायला मिळेल.  

गुगल मॅपच सांगेल किती भरायचा टोल 

या सुविधेमध्ये प्रवाशांच्या मार्गातील सर्व टोल गेट्सची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होईल. त्यातून प्रवासादरम्यान लागणाऱ्या टोलची माहिती प्रवाशांना प्रवास सुरू करायच्या आधीच मिळेल. टोल गेट्सचा मार्ग स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेणे प्रवाशांना त्यामुळे सोयीचे होईल. त्यामुळे ही सुविधा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे फीचर सर्वच देशांत उपलब्ध असेल का, याची माहिती मात्र तात्काळ उपलब्ध होऊ शकली नाही. 

टॅग्स :googleगुगल