शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, SwaRail सुपर अ‍ॅप लाँच; एकाच प्लॅटफॉर्मवर मिळेल सर्व सेवांचा लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:44 IST

SwaRail SuperApp : भारतीय रेल्वेचे हे नवीन सुपर अ‍ॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्सने (CRIS) विकसित केले आहे. सध्या हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

SwaRail SuperApp :  नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने एक नवीन सुपर अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपचे नाव SwaRail असे आहे. या अ‍ॅपवर प्रवाशांना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेता येणार आहेत. भारतीय रेल्वेचे हे नवीन सुपर अ‍ॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्सने (CRIS) विकसित केले आहे. सध्या हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

अनेक सेवांचा लाभ मिळेलरेल्वेच्या या सुपर अ‍ॅपमध्ये सुद्धा सध्या विविध अ‍ॅप्सद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा मिळतील. या SwaRail अ‍ॅपच्या मदतीने प्रवासी आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकतील. तसेच, प्लॅटफॉर्म तिकिटे, पार्सल बुकिंग आणि पीएनआर बद्दल माहिती देखील मिळू शकेल. दरम्यान, या अ‍ॅपनंतर सध्या असलेले आयआरसीटीसी अ‍ॅप बंद होईल की ते सुद्धा चालू राहील, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ट्रॅव्हल असिस्टंट फीचर असेलरेल्वेच्या SwaRail या नवीन सुपर अ‍ॅप अंतर्गत, युजर्सना ट्रॅव्हल असिस्टंट फीचर देखील मिळेल. ज्यामध्ये सिंगल साइन-ऑन, ऑनबोर्डिंग आणि इतर अनेक सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळतील. तसेच, याठिकाणी युजर्सना वेगवेगळ्या अ‍ॅप्ससाठी वेगवेगळे लॉगिन आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. साध्या साइन इनच्या मदतीने, प्रवासी सहजपणे लॉग इन करू शकतील. नवीन युजर्सना सुरुवातीला काही महत्त्वाची माहिती अपडेट करावी लागेल.

सध्या कुठे डाऊनलोड करू शकता?जर तुम्हीही रेल्वेचे हे सुपर अ‍ॅप डाउनलोड करण्याचा विचार करत असाल, तर ते सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, अँड्रॉइड आणि अ‍ॅप स्टोअरवरील बीटा टेस्टिंगचे स्लॉट फुल झाले आहेत. तसेच, हे अ‍ॅप स्टेबल व्हर्जनमध्ये कधी लाँच केले जाईल, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

काय आहे सुपर अ‍ॅप SwaRail?भारतीय रेल्वेचे सुपर अ‍ॅप SwaRail हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. येथे युजर्सना एकाच अ‍ॅपवर सर्व सेवा मिळतील. सध्या रेल्वे सेवांसाठी वेगवेगळे अ‍ॅप्स आहेत, ज्यांना एका सुपर अ‍ॅपच्या मदतीने एकाच छत्राखाली आणावे लागेल. हे अगदी चीनच्या WeChat सारखे असणार आहे, जिथे युजर्सना एकाच मोबाइल अ‍ॅपमध्ये सर्व प्लॅटफॉर्मच्या सेवा मिळतात. या अॅपमध्ये पेमेंट सेवा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हिडिओ प्लॅटफॉर्म आणि चित्रपट तिकीट बुकिंग इत्यादी सेवांचा अनुभव घेऊ शकतात.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेtechnologyतंत्रज्ञान