शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

मस्तच! आता Aadhar Card शिवाय देखील मिळेल LPG Cylinder वर सबसिडी, फक्त करावं लागणार "हे" काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 10:41 IST

LPG Cylinder Subsidy : सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गॅस कनेक्शनसोबत तुमचे आधार कार्ड लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे.

नवी दिल्ली - दर महिना अथवा दी़ड महिन्याने गॅस सिलिंडर (Gas Cylinder booking) हा बुक केला जातो. घरगुती एलपीजी गॅसचे बुकिंग केल्यानंतर पाठवण्यात येणारी सबसिडी (LPG Cylinder Subsidy) सरकारकडून ग्राहकांच्या खात्यामध्ये थेट पाठवली जाते. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गॅस कनेक्शनसोबत तुमचे आधार कार्ड लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा कोणत्याही कारणास्तवर आधार कार्ड आणि गॅस कनेक्शन लिंक नसेल तरी देखील आता सबसिडी मिळवू शकता. मात्र यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेऊया. 

अशा प्रकारे घ्या सबसिडीचा फायदा 

- गॅस सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन एलपीजी डिस्ट्रिब्यूटरला बँक खाते क्रमांक द्यावा लागेल

-ज्यानंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडीची रक्कम थेट जमा होईल

- बँक खात्याच्या माहितीमध्ये तुम्हाला खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचा आयएफएससी (IFSC Code) कोड आणि 17 अंकी एलपीजी कंझ्यूमर आयडी द्यावा लागेल.

- ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्याच ग्राहकांना ही सुविधा देण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीने गॅस कनेक्शनशी असं लिंक करा तुमचं आधार कार्ड

- सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर इंडेन गॅस कनेक्शनमध्ये रजिस्टर करावा लागेल

- यानंतर आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जा. याठिकाणी तुम्हाला आवश्यक डिटेल्स भरावे लागतील.

- यामध्ये बेनिफिट टाईपमध्ये एलपीजी, स्कीमचं नाव, आणि वितरकाचं नाव तसेच ग्राहक क्रमांका टाका.

- आधार नंबर टाकण्याआधी तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका. 

- सबमिट बटणवर क्लिक करा. यानंतर मोबाईल, ई-मेलवर एक ओटीपी येईल.

- वन टाईम पासवर्ड टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अरे व्वा! आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन बुक करता येणार LPG सिलिंडर

घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक सोपा पर्याय उपलब्ध होणार आहे. आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन LPG सिलिंडर बुक करता येणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईलकडून यावर्षी आपल्या LPG गॅसधारकांसाठी ही नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एक मिस्ड कॉल देऊन सिलेंडर बुक करता येणार आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभरात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.  ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल द्यावा लागेल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. सध्याच्या आईवीआरएस (इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) कॉल प्रणालीत कॉलसाठी सामान्य दर आकारले जातात. मात्र, आता नव्या सुविधेमुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि आईवीआरएस प्रणालीचा वापर करण्यात अडचणी जाणवणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डCylinderगॅस सिलेंडरtechnologyतंत्रज्ञान