Sony चा जबरदस्त पोर्टेबल व्हायरलेस स्पिकर भारतात लाँच, जाणून घ्या Sony SRS-XB13 Extra Bass ची किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2021 04:59 PM2021-06-21T16:59:09+5:302021-06-21T17:02:58+5:30

Sony Portable Bluetooth Speakers: Sony SRS-XB13 स्पिकर IP67 डस्ट अँड वाटर रसिस्टेंस आहे, हा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून विकत घेता येईल 

Sony srs xb13 extra bass launched in india at rs 3990 specification features portable wireless bluetooth speaker  | Sony चा जबरदस्त पोर्टेबल व्हायरलेस स्पिकर भारतात लाँच, जाणून घ्या Sony SRS-XB13 Extra Bass ची किंमत 

Sony SRS-XB13 Extra Bass ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून विकत घेता येईल.

Next

सोनीने भारतात Sony SRS-XB13 Extra Bass पोर्टेबल व्हायरलेस स्पिकर लाँच केला आहे. या स्पिकरची किंमत 3,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा कॉम्पॅक्ट ब्लूटूथ स्पिकर IP67 डस्ट अँड वाटर रसिस्टेंससह येतो. हा स्पिकर Amazon, Flipkart, Sony Center स्टोर आणि इतर रिटेलर्स स्टोर्सवरून विकत घेता येईल.  

Sony SRS-XB13 Extra Bass ची किंमत 

Sony SRS-XB13 भारतात 3,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या किंमतीती सिंगल टॉप फायरिंग स्पिकर्स खूप कमी आहेत. सोनी ब्रँडमुळे हा नवीन स्पिकर ग्राहकांच्या पसंतीस उतरू शकतो. Sony SRS-XB13 ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून विकत घेता येईल.  

Sony SRS-XB13 Extra Bass चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स  

घराबाहेर वापर करता यावा म्हणून Sony SRS-XB13 मध्ये IP67 डस्ट अँड वाटर रसिस्टेंस देण्यात आले आहे. हा स्पिकर पाण्यात पडला तरी हा बिघडणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. 253 ग्राम वजन असलेल्या या स्पिकरमध्ये एक 46mm स्पिकर ड्रायव्हर देण्यात आला आहे. 

Sony SRS-XB13 मध्ये ब्लूटूथ 4.2, SBC आणि AAC ब्लूटूथ कोडॅक सपोर्ट मिळतो. हा यूएसबी टाइप-सी पोर्टने चार्ज करता येईल. हि बॅटरी फुल चार्ज केल्यावर 16 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. हा डिवाइस इनबिल्ट माइक्रोफोन असलेला हा ब्लूटूथ स्पिकर गुगल फास्ट पेयर सपोर्टसह येतो.  

Web Title: Sony srs xb13 extra bass launched in india at rs 3990 specification features portable wireless bluetooth speaker 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.