शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

महाऑफर! आयफोनच्या तोडीच्या Xiaomi 12 Pro वर 10 हजारांची सवलत; 50MP चे तीन-तीन कॅमेरे 

By सिद्धेश जाधव | Updated: May 2, 2022 18:08 IST

50MP चे तीन कॅमेरा सेन्सर्स, 12GB RAM, 2K+ डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंग असलेल्या Xiaomi 12 Pro आजपासून विकत घेता येईल.  

शाओमीनं आपला हुकमी एक्का गेल्या आठवड्यात भारतात सादर केला होता. आयफोनच्या तोडीचे फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 Pro भारतीयांच्या भेटीला आला आहे. 2 मे अर्थात आजपासून हा दणकट स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे पहिल्याच सेलमध्ये 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर्स, 12GB RAM, 2K+ डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंग असलेल्या Xiaomi 12 Pro वर मोठी सूट मिळत आहे.  

मई) या फोनची पहली विक्री होने जा रही आहे. इसे ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अ‍ॅमेझॉन व्यतिरिक्त Mi.com से दुपारी 12 वाजता विकत घेता येईल. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट, तीन 50 MP चा कॅमेरा, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि सुपर फास्ट चार्जिंग जैसे फीचर्स देण्यात आले आहेत. 

Xiaomi 12 Pro ची किंमत आणि ऑफर्स  

हा फोन Noir Black, Opera Mauve आणि Couture Blue कलरमध्ये कंपनीच्या वेबसाईटसह ईकॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल.  Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोनचे दोन रॅम व्हेरिएंट 256GB स्टोरेजसह भारतात आले आहेत. 62999 रुपयांमध्ये 8GB RAM व्हेरिएंट विकत घेता येईल तर 12GB RAM व्हेरिएंटची किंमत 66,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ICICI बँकेच्या कार्डवर 6,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल तसेच लाँच ऑफर अंतर्गत शाओमी 4000 रुपये ऑफ देईल.  

Xiaomi 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

शाओमी 12 प्रो स्मार्टफोनमध्ये 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा 2के डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा ई5 अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 पॅनल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला विक्टसच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. हा फोन 10बिट कलर आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.  

फोटोग्राफीसाठी शाओमी 12 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स707 7पी लेन्स मुख्य सेन्सरचे काम करते. सोबत 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सलचाची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

पावर बॅकअपसाठी Xiaomi 12 Pro मध्ये 4,600एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. यातील 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला हा फोन मिनिटांत फुल चार्ज करेल. हा फोन फक्त 18 मिनिटांत 0 ते 100 टक्के पर्यंत चार्ज होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हा डिवाइस 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. 

Xiaomi 12 Pro लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित नव्या कोऱ्या मीयुआय 13 वर चालतो. 3 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसरसह 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट या शाओमी 12 प्रो चा सर्वात मोठा आकर्षण बिंदू आहे. हा फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान