शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सावधान! : सॅनिटायझरमुळे स्मार्टफोनची लागतेय वाट, मोबाईल सॅनिटाईझ करण्यासाठी वापरा 'ही' योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 20:27 IST

अनेक लोक आपला फोन सॅनिटाईझ करण्यासाठी अँटी बॅक्टेरिअल वेट-वाइप्सदेखील वापरत आहेत. तर काही लोक असेही आहेत, जे फोन स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनेटायझरचा वापर करत आहेत.   

नवी दिल्ली - भारतासह संपूर्ण जगातच कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. जगातील सर्वच देश आपल्या नागरिकांना या काळात साबन अथवा सॅनिटायझरने हात धुन्याचा सल्ला देत आहेत. लोक सॅनिटायझरचा वापर अगदी मोबाईल फोन सॅनिटाईझ करण्यासाठीही करत आहेत.

अनेक लोक आपला फोन सॅनिटाईझ करण्यासाठी अँटी बॅक्टेरिअल वेट-वाइप्सदेखील वापरत आहेत. तर काही लोक असेही आहेत, जे फोन स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनेटायझरचा वापर करत आहेत.   

या लोकांना सॅनिटायझरमुळे फोनचे काय नुकसान होते, हेच माहित नाही. खरे तर सॅनिटायझर वापरल्याने फोनच्या स्क्रीनसोबतच हेडफोन जॅक आणि स्पीकरदेखील खराब होत आहेत.

काही मोबाईल दुरुस्त करणारे लोक सांगतात, की सध्या त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी येत असलेले अधिकांश मोबाईल सॅनिटायझरमुळेच खराब झालेले आहेत. त्यांनी सांगितले, की मोबाईलला सॅनिटायझर लावताना लोकांकडून अनेकता मोबाईलच्या हेडफोन जॅकमध्ये सॅनिटाईझर जाते. यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन फोन खराब होत आहेत. एवढेच नाही, तर अनेक लोकांच्या फोनचे डिस्प्ले आणि कॅमऱ्याच्या लेन्सदेखील सॅनिटायझरमुळे खराब झाल्या आहेत.

ही आहे मोबाईल स्वच्छ करण्याची योग्य पद्धत -

मेडिकल वाइप्सचा करा वापर -मोबाईल स्वच्छ करण्यासाठी आपल्याला बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही 70 टक्के अल्कोहोल असलेल्या मेडिकल वाइप्सचा वापर करता येईल. याच्या सहाय्याने आपला फोन चांगल्या प्रकारे स्वच्छ होईल.

कापसाचा वापर करा - सर्वप्रथम तुमचा फोन स्विच ऑफ करा. यानंतर कापसाचा एक तुकडा  रबिंग अल्कोहलमध्ये बुडवा आणि नंतर आपल्या फोनची स्क्रिन सरळ धरून साफ करा. खरे तर, आपण आपल्या मोबाईल कस्टमर केअरवरूनच मोबाईल स्वच्छ करण्याचा सल्ला घेणे योग्य आहे. कारण सर्वच कंपन्यांचे फोन मटेरिअल वेगवेगळे असते.

अॅन्टी बॅक्टेरिअल पेपर-अनेक मेडिकल्सवर आपल्याला सहजपणे अँटी बॅक्टेरिअल टिश्यू पेपर्स मिळतील. यानेही आपण आपला फोन स्वच्छ करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्‍टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार 

रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान