शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या गोपनीय माहितीची चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 05:03 IST

अँण्ड्रॉइड अ‍ॅप बेकायदेशीररीत्या मिळवितात वापरकर्त्यांचा डेटा

नवी दिल्ली : आपली कोणती माहिती अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅपसोबत सामायिक करायची किंवा नाकारायची हा पर्याय वापरकर्त्यांना उपलब्ध असला तरी हजारो अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप परवानगी नसतानाही वापरकर्त्यांचा डेटा परस्पर चोरत असल्याचे समोर आले आहे.

इंटरनॅशनल कॉम्प्युटर सायन्स इन्स्टिट्यूट या संस्थेने हा अभ्यास केला. अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनच्या वैयक्तिक गोपनीयता विभागाकडे मागील महिन्यात संस्थेने आपला अहवाल सादर केला. अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा पर्दाफाश केला आहे.गुगल प्ले स्टोअरवरील ८८ हजार अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅपचा अभ्यास संस्थेने केला. यातील १,३२५ अ‍ॅप खासगी डेटा संपर्क परवानगी नसतानाही आडमार्गाने मिळवीत असल्याचे आढळून आले. हे चोरटे अ‍ॅप वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवरील अशा अ‍ॅपशी संधान बांधतात ज्यांना डेटा संपर्काची परवानगी आहे. परवानगी प्राप्त अ‍ॅपला जो गोपनीय डेटा उपलब्ध होतो, तो सर्व डेटा प्रतिबंधित अ‍ॅपलाही या मार्गाने उपलब्ध होतो. प्रतिबंधित माहिती चोरण्यासाठी अ‍ॅपमध्ये असलेल्या कॉमन एसडीके (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कीट) लायब्ररीचा वापर केला जातो.क्विक हिल टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर म्हणाले की, स्मार्टफोनमधील एखादे अ‍ॅप चोरटे एसडीके वापरत आहे का, हे कळण्याचा कोणताही मार्ग सामान्य वापरकर्त्यांकडे उपलब्ध नाही.

अशी मिळवली जाते युजरची माहितीफोनधारकाने लोकेशन सामायिक केलेले नसले तरी थर्डपार्टी लायब्ररीज असलेले अ‍ॅप हे लोकेशन मिळवून साठवून ठेवते. ही माहिती हस्तांतरितही होते. अनेक अ‍ॅप स्मार्टफोनची ओळख असलेला आयएमईआय क्रमांक, वापरकर्त्याचा ई-मेल आयडी आणि फोन क्रमांकही मिळवितात.फोटोमधील जीओ टॅगिंगच्या माध्यमातून ते जीपीएस समन्वयही प्रस्थापित करतात. त्यातून वापरकर्त्याचे लोकेशन अ‍ॅपला सतत मिळत राहते. ही माहिती विश्लेषित करून वापरकर्त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याला जाहिराती पाठविल्या जातात.