शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

नेटफ्लिक्सचा खरा स्पर्धक कोण?- झोप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 05:22 IST

विकएंडलाही बिंज वॉचिंगचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहेच ,पण आता कोरोनामुळे सगळंच आयुष्य ऑनलाईन झाल्यापासून कामाच्या दिवसांमध्ये ही OTT चॅनल्स बघण्याकडेही अनेकांचा कल असल्याचं दिसून येतं. 

बिंज वॉचिंग सिंड्रोममध्ये कुणीही अडकू शकतं. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत. आणि या प्रवासातील सगळ्यात मोठी अडचण असते ती मॅरेथॉन व्ह्यूईंग. आपल्या लक्षात येत नाही पण आपण जर वेळ लावून OTT चॅनल्स बघितले तर लक्षात येईल की आपला किती प्रचंड वेळ यात जातो. विकएंडलाही बिंज वॉचिंगचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहेच ,पण आता कोरोनामुळे सगळंच आयुष्य ऑनलाईन झाल्यापासून कामाच्या दिवसांमध्ये ही OTT चॅनल्स बघण्याकडेही अनेकांचा कल असल्याचं दिसून येतं. मॅरेथॉन व्ह्यूईंग हा यातला सगळ्यात मोठा अडथळा. त्यामुळे शरीराचं चक्र बिघडतं. रात्री ९/१० पासून पहाटे ५/६ वाजेस्तोवर असं रोज किंवा आठवड्यातून तीन चार दिवस जर कुणी सीरियल आणि सिनेमे बघत असेल तर त्याच्या झोपेचं, पचन व्यवस्थेचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. २०१७ मध्ये नेटफ्लिक्सचे सीईओ रिड हेस्टिंग्स यांनी नेटफ्लिक्सची स्पर्धा माणसांच्या झोपेशी असल्याचं म्हटलं आहे. खरंतर फक्त नेटफ्लिक्सच नव्हे, तर तमाम आभासी जग माणसांच्या झोपेशी स्पर्धा करतंय. माणसं जितकी कमी झोपतील ;  या चॅनल्सचा नफा तितका वाढणार हे सरळ गणित आहे. थोडं थांबा... १) बिंज वॉचिंग सिंड्रोम मधून बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आहे : थोडं थांबा. टेक अ ब्रेक. सलग किती तास आपण सीरियल आणि सिनेमे बघणार आहोत याचा विचार करून एक नियम करा. वेळेची ही शिस्त काटेकोरपणे पाळा. २) बिंज वॉचिंगसाठी हातातली महत्त्वाची कामे आपण बाजूला ठेवू लागलो आहोत का याकडे लक्ष असू द्या. जर तसं होत असेल तर तो रेड अलर्ट आहे. ३) आपल्याला सतत मनोरंजनाची गरज नसते. त्यामुळे व्यायाम, काम, घरकाम, सकस जेवण, व्यवस्थित झोप, पुस्तक वाचन, आवडतं संगीत ऐकणं, मित्रमैत्रिणी, कुटुंबीय यांच्याशी ऑनलाईन / ऑफलाईन  गप्पा मारणं या गोष्टी चुकून ही बाजूला ठेवू नका. ४) सीरियल आणि सिनेमे ज्या त्या चॅनल्स वरुन कुठेही जात नसतात. ते तिथेच असणार आहेत. त्यामुळे आरामात, हळूहळू एकेक करुन बघितलं तरी चालण्यासारखं असतं.  बकाबका सगळं बघून टाकण्याची गरज नाही. पुढच्या भागात : पेरेंटल कंट्रोल्स कसे वापरावेत ? 

टॅग्स :Netflixनेटफ्लिक्स