शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्काईप अ‍ॅपचे अपडेट सादर : नवीन फिचर्सचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 16:31 IST

स्काईप सेवेच्या डेस्कटॉप अ‍ॅपची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून याच्या माध्यमातून युजर्सला अनेक नवीन फिचर्सचा लाभ देण्यात आला आहे.

स्काईप सेवेच्या डेस्कटॉप अ‍ॅपची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून याच्या माध्यमातून युजर्सला अनेक नवीन फिचर्सचा लाभ देण्यात आला आहे.

स्काईप सेवेचा संगणकावरून लाभ घेणार्‍यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात याच्या डेस्कटॉप अ‍ॅपचा वापरदेखील खूप होत असतो. या अनुषंगाने या अ‍ॅपचे ताजे अपडेट सादर करण्यात आले आहे. ही स्काईपची आठवी आवृत्ती असणार आहे. यात आधीच्या अर्थात सातव्या आवृत्तीपेक्षा काही नवीन सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यामध्ये एचडी व्हिडीओ कॉलींगची सुविधा देण्यात आलेली आहे. अर्थात आता युजर यावरून हाय डेफीनेशन क्वॉलिटीचे कॉल्स करू शकणार आहे. यामध्ये ‘इन-कॉल स्क्रीन शेअरिंग’ हे स्वतंत्र फिचरदेखील असणार आहे. यात कुणीही युजर ‘@’ या चिन्हाने समोरच्या युजरसोबत आपला स्क्रीन शेअर करू शकतो. एकाच वेळी २४ युजर्ससोबत या प्रकारचे शेअरिंग करता येणार आहे. संभाषणाच्या दरम्यान युजर ३०० मेगाबाईटपर्यंतच्या विविध फाईल्स, व्हिडीओज, प्रतिमा आदींनाही शेअर करू शकेल. यासाठी यामध्ये नवीन मीडिया गॅलरीदेखील देण्यात आलेली आहे. यावर क्लिक करून कुणीही या गॅलरीतील विविध फाईल्सला पाहू शकतो. 

दरम्यान, स्काईपवर बहुप्रतिक्षित असणारे कॉल रेकॉर्डींगचे फिचरदेखील युजरला लवकरच मिळणार आहे. ही क्लाऊडवर आधारित सेवा असण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये याला वापरण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. स्काईपच्या माध्यमातून करण्यात येणारा संवाद हा सुरक्षित मानला जातो. तथापि, याला अद्यापदेखील ‘एंडी-टू-एंड एनक्रीप्शन’चे सुरक्षा कवच मिळालेले नाही. येत्या कालखंडात याबाबतही घोषणा होऊ शकते. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान