Sim Card: सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 10:07 AM2022-09-01T10:07:07+5:302022-09-01T10:07:32+5:30
जेव्हा सिमकार्ड बनविण्यात आली तेव्हा ती आयताकृती म्हणजेच चार कोनांची होती. मात्र आता ती एका कोनातून कापली जातात, व पंचकोनी होतात.
जगभरात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या सिम कार्ड बनवितात. परंतू, य़ापैकी एकही कंपनी आयताकृती सिमकार्ड का बनवत नाहीत. सगळी सिमकार्ड एका कोनातून कापलेली असतात. हे भारतातच नाही तर जगभरात अशीच सिमकार्ड मिळतात. हीच सिमकार्ड सुरुवातीला आयताकृती असायची, मग नंतर का म्हणून बदलली.
जेव्हा सिमकार्ड बनविण्यात आली तेव्हा ती आयताकृती म्हणजेच चार कोनांची होती. मात्र आता ती एका कोनातून कापली जातात, व पंचकोनी होतात. जसेजसे मोबाईलमध्ये बदल होत गेले, तसतसे सिमकार्डही बदलत गेले. आपण जेव्हापासून सिमकार्ड वापरतोय तेव्हापासून ती कोनातून कापलेलीच मिळतात.
जेव्हा सिम कार्ड चौकोनी बनवले गेले तेव्हा लोकांना सिमची सरळ किंवा उलट बाजू कोणती हे समजणे कठीण झाले. यामुळे अनेक वेळा लोक मोबाईलमध्ये सिम उलटे ठेवत असत. नंतर ते काढणेही अवघड होते. काही वेळा सिमची चिप देखील खराब होत होती. यावर उपाय म्हणून कंपन्यांनी सिमचे डिझाईन बदलले. सिमकार्ड कोपऱ्यातून कापल्याने लोकांचे कन्फ्यूजन दूर झाले आणि ते सिमकार्ड ट्रे मधून काढणे देखील सोपे झाले.
सिमकार्ड कसे काम करते...
मोबाईलमध्ये सिमकार्ड (SIM Card) हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्युल (Subscriber Identity Module) SIM चा फुलफॉर्म असा आहे. सिमकार्ड हे एक इंटिग्रेटेड सर्किट (Integrated Circuit) असतं आणि ते ऑपरेटिंग सिस्टीम चालवतं. या कार्डमध्ये इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्रायबर आयडेंटिटी (IMSI) सुरक्षितपणे साठवलेली असते. सिमकार्ड खरेदी केल्यानंतर प्रत्येक सबस्क्रायबरला एक युनिक क्रमांक (Unique Number) मिळतो. IMSI आणि युनिक क्रमांकामुळे डिव्हाइसवरच्या युजरची ओळख पटते. 15 मिमी लांब, 25 मिमी रुंद आणि 0.76 मिमी जाडी अशा पद्धतीने हे सिमकार्ड डिझाईन केलेलं दिसतं.