शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शाओमी मी ए१ स्मार्टफोनची रोझ गोल्ड आवृत्ती लवकरच दाखल होणार

By शेखर पाटील | Updated: November 21, 2017 11:52 IST

शाओमी कंपनीने आपल्या मी ए१ या स्मार्टफोनची रोझ गोल्ड ही नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देशाओमी मी १ हे मॉडेल अँड्रॉइड वन या प्रणालीवर चालणारे आहेशाओमी मी ए १ हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेयाला ओरिओ या आवृत्तीचे अपडेट लवकरच प्रदान करण्यात येणार आहे

शाओमी कंपनीने आपल्या मी ए१ या स्मार्टफोनची रोझ गोल्ड ही नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

शाओमी मी ए १ हे मॉडेल भारतात ५ सप्टेबर रोजी लाँच करण्यात आले होते. प्रारंभी हा स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्ड या रंगाच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. आता याची रोझ गोल्ड या रंगातील आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. शाओमी मी ए १ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना मूळ मॉडेलप्रमाणेच १४,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आला असून याला कंपनीच्या मी.कॉम या संकेतस्थळासह फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी याचा पहिला सेल आहे.

शाओमी मी १ हे मॉडेल अँड्रॉइड वन या प्रणालीवर चालणारे आहे. गुगलने अँड्रॉइड वन या प्रणालीच्या अंतर्गत किफायतशीर दरातील स्मार्टफोन्सला आपल्या ऑपरेटींग सिस्टीमच्या अद्ययावत आवृत्तीचा वापर करण्याचे सुविधा प्रदान केलेली आहे. म्हणजेच शाओमी मी ए १ हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून याला ओरिओ या आवृत्तीचे अपडेट लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.  या मॉडेलमधील दुसरे विशेष फिचर म्हणजे यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. यातील एकाला टेलिफोटो लेन्स तर दुसर्‍याला वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. यात बोके इफेक्टची सुविधा देण्यात आली आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल.

शाओमी मी ए १ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते ३०० जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील असेल. तर कनेक्टीव्हिटीसाठी फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान