शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Twitter वर आता मिळणार शॉपिंगची सुविधा, कंपनी करतेय नवीन फीचरची टेस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 13:11 IST

twitter is testing shopping feature for android users : ट्विटरने आपल्या नवीन फीचरची टेस्टिंग सुरू केली आहे. हे फीचर आधी अँड्राईड फोनवर टेस्टिंग केले जात आहे.

ठळक मुद्दे रिपोर्टनुसार, लवकरच युजर्संना ट्विटरवर शॉपिंगची सुविधा मिळणार असून यासाठी कंपनी ई-कॉमर्स सेवा सुरू करणार आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसंबंधित बातम्या येत आहेत की कंपनी युजर्संच्या सुविधेसाठी नवीन फीचर्स घेऊन येत आहे. यातच आता समोर आलेल्या नवीन रिपोर्टनुसार, लवकरच युजर्संना ट्विटरवर शॉपिंगची सुविधा मिळणार असून यासाठी कंपनी ई-कॉमर्स सेवा सुरू करणार आहे. (social media twitter is testing shopping feature for android users here are the detail)

ट्विटरने आपल्या नवीन फीचरची टेस्टिंग सुरू केली आहे. हे फीचर आधी अँड्राईड फोनवर टेस्टिंग केले जात आहे, ज्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, हे फीचर आधी अँड्राईड युजर्संना उपलब्ध होईल. Tech Crunch च्या रिपोर्टनुसार, ट्विटरचे शॉपिंग फीचर सर्वप्रथम कतारमध्ये दिसले आणि याची माहिती ब्रिटनच्या सोशल मीडिया कन्सल्टंट  Matt Navarra ने दिली होती.

ट्विटरच्या शॉपिंग फीचरची टेस्टिंग कतारमध्ये सुरू करण्यात आली असून काही अँड्रॉईड यूजर्सच्या ट्विटर अ‍ॅपमध्ये शॉपिंग कार्ड्स आणि शॉपिंग लिंकचा पर्याय असल्याचेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. शॉपिंग कार्ड ट्विटर फीडमध्येही दिसून येत आहे. याशिवाय एक मोठे निळा रंगाचे शॉप बटण देखील असणार आहे.

तसेच, ट्विटरच्या शॉपिंग कार्डमध्ये एखाद्या उत्पादनाच्या किंमतीविषयीही माहिती देण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. मात्र, अद्याप शॉपिंग फिचरबाबत कंपनीकडून अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. यासाठी युजर्सना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ट्विटर आपल्या युजर्संना चांगल्या सुविधा देत आहे.

कंपनी त्याच श्रेणीतील नवीन पर्यायांचा विस्तारही करीत आहे. यामध्ये मॅप्स आणि सुपर फॉलोज इंटीग्रेटेड फेसबुक सारख्या बिझनेस प्रोफाइलचा समावेश आहे. ज्यामुळे युजर्सला त्यांच्या फॉलोअर्ससाठी एक्सक्लुसिव्ह कंटेंट देण्याची सुविधा देत आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानTwitterट्विटर