शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेनहायझरचा स्मार्ट हेडसेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 14:09 IST

ध्वनी उपकरणांमधील ख्यातनाम नाव असणार्‍या सेनहायझर कंपनीने थ्री-डी सराऊंड साऊंडची रेकॉर्डींग करण्यास सक्षम असणारा अ‍ॅमबिओ हा स्मार्ट हेडसेट भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.

ध्वनी उपकरणांमधील ख्यातनाम नाव असणार्‍या सेनहायझर कंपनीने थ्री-डी सराऊंड साऊंडची रेकॉर्डींग करण्यास सक्षम असणारा अ‍ॅमबिओ हा स्मार्ट हेडसेट भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. सध्या ३६० अंशातील छायाचित्रण/चलचित्रीकरण आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी या बाबी लोकप्रिय होत आहेत. या माध्यमातून आपल्या भोवतालाला परिपूर्ण पद्धतीनं अनुभवता येते. याच पद्धतीनं ३६० अंशातील ध्वनी (थ्री-डी सराऊंड साऊंड) देखील अगदी उत्तम श्रवणाची अनुभूती प्रदान करत असतो. मानवी कानाप्रमाणेच चारही बाजूंनी येणारा आवाज आपण या माध्यमातून अनुभवू शकतो. याचा विपुल प्रमाणात वापर सुरू झाला असला तरी सर्वसामान्य युजर्सला याबाबत फार काही माहिती नाही. या पार्श्‍वभूमिवर, सेनहायझर कंपनीने अ‍ॅमबिओ हा स्मार्ट हेडसेट ग्राहकांना सादर केला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे याच्या मदतीने कुणीही आपल्या भोवतालचा ध्वनी थ्री-डी सराऊंड साऊंड या प्रकारात रेकॉर्ड करू शकतो. 

सेनहायझर अ‍ॅमबिओ हे मॉडेल अन्य हेडसेटप्रमाणेच दिसते. मात्र याच्या इयरपीसच्या वरील बाजूस अतिशय उत्तम दर्जाचे आणि सर्व दिशांना फिरू शकणारे मायक्रोफोन देण्यात आले आहेत. याच्या मदतीने संबंधीत युजरच्या भोवतालाचा ध्वनी ३६० अंशात रेकॉर्ड करता येतो. अर्थात यासाठी स्मार्टफोन अटॅच करण्याची आवश्यकता आहे. आणि या स्मार्टफोनवर व्हिडीओ रेकॉर्डींग सुरू केल्यास उत्तम. म्हणजेच यातून सराऊंड साऊंडने युक्त असणारा व्हिडीओ तयार करता येतो. याशिवाय, हा स्मार्ट हेडसेट नियमित इयरफोन म्हणूनही वापरता येणार आहे. तसेच यावरून स्मार्टफोनवर कॉल करता वा रिसीव्ह करता येतील. याच्या सोबत एक कनेक्टर देण्यात आले असून यावरून यातील मायक्रोफोनची लेव्हल कमी/जास्त करता येणार आहे. याच्यासाठी स्वतंत्र स्मार्टफोन अ‍ॅपदेखील तयार करण्यात आले आहे. सध्या सेनहायझरचा अ‍ॅमबिओ हा स्मार्ट हेडसेट फक्त आयओएस प्रणालीवर वापरता येणार आहे. अर्थात याला आयफोन व आयपॅडला कनेक्ट करता येणार आहे. मात्र लवकरच याला अँड्रॉइडचा सपोर्ट देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. हा हेडसेट ग्राहकांना १९,९९० रूपये मूल्यात सेनहायझरच्या संकेतस्थळासह शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आला आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान