शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाची कमाल! शास्त्रज्ञांनी विकसित केलं Corona Risk Calculator; लसीची पहिली गरज कोणाला हे सांगणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 14:36 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असून जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असून जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान शास्त्रज्ञांनी एक जबरदस्त कॅल्क्यूलेटर विकसित केलं आहे. ज्याच्या मदतीने कोरोना लसीची सर्वात पहिला कोणाला गरज आहे याची  माहिती मिळणार आहे. जॉन्स हॉपकिंस ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी कोरोना व्हायरस मॉर्टैलिटी रिस्क कॅल्क्यूलेटर (Coronavirus Mortality Rate Risk Calculator) तयार केलं आहे.

कॅल्क्यूलेटरमुळे लसीकरणावेळी प्राधान्यक्रम ठरवणं सहज सोपं होणार आहे. कोणत्या वयोगटातील लोकांना सर्वप्रथम लसीकरणाची आवश्यक आहे हे सांगणार आहे. तसेच एखाद्या देशातील कोरोनाची स्थिती, सोशियो डेमोग्राफिक आकड्याचं विश्लेषण देखील देणार आहे. सध्या या कॅल्क्यूलेटरची चाचणी घेतली जात आहे. वय, लिंग आणि वैद्यकीय इतिहास यांच्या आधारे या कॅल्क्यूलेटरच्या साह्याने एखाद्या व्यक्तीला कोविड-19च्या संसर्गाच्या धोक्याचा अंदाज घेता येणार आहे.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेमध्ये कार्यरत असलेले नीलांजन चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही विकसित केलेल्या कॅल्क्यूलेटर संख्यात्मक पद्धतीने काम करतो आणि कोरोनाचा धोका ओळखून ज्यांना खरंच लसीकरणाची पहिला गरज आहे त्याची माहिती मिळणार आहे असं देखील म्हटलं आहे. मधूमेह असणाऱ्या रुग्णांना कितपत धोका आहे, तसेच त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल यासारख्या गोष्टींची देखील माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 

"...तर नववर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचा विस्फोट, परिस्थिती आणखी गंभीर होणार"; WHO चा इशारा

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने सात कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एक गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. तसेच नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. WHO नाताळ हा सण साजरा करताना लोकांनी मास्क घातलं नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीतर तर युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकतं असंही म्हटलं आहे. लोकांनी नाताळनिमित्त चर्चमध्ये जाताना किंवा पार्ट्यांना जाताना मास्क नाही घातले तर नववर्षामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळू शकेल असा धोक्याचा इशाराही दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtechnologyतंत्रज्ञान