शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

क्यूआर काेड करताय स्कॅन? स्मार्टफाेन हॅक हाेण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 08:29 IST

वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या ताब्यात, भारत आणि अमेरिकेत सर्वाधिक धाेका

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात क्यूआर काेडद्वारे पेमेंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यूपीआयवर आधारित पैसे देण्याची ही पद्धत लाेकप्रिय ठरली. त्यामुळे साहजिकच सायबर भामटेदेखील याकडे वळले आहेत. बनावट क्यूआर काेड लावून लाेकांचे स्मार्टफाेन हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये हा धाेका वाढला आहे.

स्कॅमर्स खऱ्या क्यूआर काेडऐवजी खाेटा काेड चिकटवतात. त्यातून फाेन हॅक केला जाताे. सर्व माहिती हॅकर्सला मिळते आणि काही क्षणांत खाते रिकामे हाेते. एवढेच नव्हेतर, तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेलदेखील केले जाते. यासंदर्भात एफबीआयने इशारा दिला आहे. क्रिप्टाेविश्वातही स्कॅमखाेटे क्यूआर काेड क्रिप्टाेकरन्सी उद्याेगातही आहेत. क्रिप्टाेमध्ये क्यूआर काेडद्वारे देवाणघेवाण हाेते. त्यामुळे स्कॅमर्सकडून हे क्षेत्र टार्गेट केले जाते.

कसा हाेणार बचाव?n अज्ञात लाेकांकडून मिळालेले क्यूआर काेड स्कॅन करू नका.n काेड स्कॅन करताना वेब यूआरएल तपासून घ्या.n काेड नीट पाहा. एखाद्या काेडला कव्हर केलेल्या स्टीकरसारखा वाटल्यास स्कॅन करू नका.n क्यूआर काेड स्कॅन केल्यानंतर ऑटाेमॅटिक लिंक ओपन करण्याचे सेटिंग बंद करा.n क्यूआर काेडमधील चुकीचे अक्षर किंवा स्पेलिंगकडे लक्ष द्या.

या देशांमध्येही धाेका वाढलाभारत, अमेरिकेसाेबतच जपान, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड इत्यादी देशांमध्ये क्यूआर काेड स्कॅमचा धाेका वाढला.

अशी हाेते फसवणूकn रेस्टाॅरंट, कॅफे इत्यादी ठिकाणी क्यूआर काेड स्कॅन करून मेन्यू तुमच्या समाेर येताे. n पैसे देण्यासाठीही क्यूआर काेड असताे. मात्र, खऱ्याऐवजी स्कॅमर्स खाेटा काेड लावतात. n ताे स्कॅन केल्यावर युझर्स ऑनलाइन मेन्यू किंवा पेमेंट चेकआउटवर नेण्याऐवजी फाेनमध्ये मालवेअर टाकले  जाते आणि त्यातून वैयक्तिक माहिती चाेरली जाते.भारतात सर्वाधिक धाेकाn काेराेना काळात भारतात क्यूआर काेडचा वापर माेठ्या प्रमाणात वाढला. n जागतिक टेक सपाेर्ट स्कॅम अहवालानुसार, भारतीयांना तंत्रज्ञानाशी संबंधित वित्तीय फसवणुकीचा धाेका खूप जास्त आहे. त्यातही तरुणांची फसवणूक हाेण्याची शक्यता जास्त आहे.

भारतीयांचे सरासरी १५ ते २० हजारांचे नुकसानसर्वाधिक क्यूआर काेड स्कॅनिंग    अमेरिका    ४२.२%    भारत    १६.१%    फ्रान्स    ६.४%    ब्रिटन    ३.६%    कॅनडा    ३.६%    स्राेत : क्यूआरटायगर

टॅग्स :fraudधोकेबाजी