शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात बसणार सॅटेलाइट नेटवर्क, सरकारने दिली परवानगी, 'हे' रिचार्ज स्वस्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:10 IST

सॅटेलाइट नेटवर्कबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता काही रिचार्ज स्वस्तात मिळणार आहे. यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.

डीटीएच वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे  DTH सेवा देणाऱ्या कंपन्यांसह ग्राहकांनाही मोठा फायदा होणार आहे. परदेशी उपग्रह ऑपरेटर देखील भारतात स्थानिक युनिट्स सुरू करू शकतात, अशी नवीन धोरणात कंपन्यांना परवानगी आहे. एप्रिल २०२५ पासून, कंपन्यांना त्यांची इच्छा असल्यास भारतात नवीन सेटअप सुरू   करण्याची परवानगी आहे.

₹१९५ वर जाणार TATAचा 'हा' शेअर; गुंतवणूकदारांच्या उड्या, LICकडे आहेत ९५ कोटी शेअर्स

या निर्णयानंतर कोणतीही विदेशी कंपनी भारतात त्यांचा सेटअप सुरू करू शकते. तसेच, आता भारतीय उपग्रह वापरकर्ते याचा वापर करू शकणार आहेत. Jio, Airtel सारख्या कंपन्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. कारण यानंतर त्यांना स्वस्तात सॅटेलाइट नेटवर्क मिळणे सोपे होणार आहे.

आतापर्यंत DTH साठी सॅटेलाइट वापरण्यासाठी देखील कंपन्यांना USD मध्ये पैसे द्यावे लागतात. पण जर आता यासाठी परवानगी मिळाली आहे, तर  भारतातील कंपन्या INR मध्ये पेमेंट करू शकतात. यासंदर्भात सरकार परदेशी कंपन्यांशी करारही करत आहे. याचा फायदा ग्राहकांनाही होणार आहे. 

...तर सेवा शुल्क देखील कमी होऊ शकतात

SES, AsiaSat, Instelsat आणि Measat सारख्या कंपन्या सध्या भारतीय कंपन्यांना सॅटेलाइट नेटवर्क पुरवत आहेत. यात टीव्ही ब्रॉडकास्टर आणि डीटीएच ऑपरेटर देखील आहेत. पण आता पेमेंट डॉलरमध्ये आहे, जर INR मध्ये पेमेंट केले असेल तर सेवा शुल्क देखील कमी होऊ शकते.

यासाठी कंपन्यांना काही परवानगी काढावी लागणार आहे. इंडियन नॅशनल स्पेस प्रोमोशन ऑफ ऑथराइजेशन कडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी एप्रिल २०२५ ही अंतिम मुदतही निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक घटकांकडूनही याबाबत मदत घेता येईल. कोणत्याही परदेशी कंपनीला भारतात त्यांची सुविधा सुरू करायची असल्यास त्यांनी भारतीय एजन्सीची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानDTHडीटीएच