शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

Call Recording करणारे अ‍ॅप्स बंद, पण Samsung, Redmi, Vivo स्मार्टफोन्समध्ये असं करा रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:17 IST

Call Recording करणारे अ‍ॅप्स एक्सेबिलीटी API चा वापर करतात. यामुळे अॅप्सना अनेक प्रकारे परवानगी मिळते. याचा वापर चुकीच्या पद्धतीने अनेक डेव्हलपर्स करतात, असे कंपनीने म्हटले आहे.

गुगलने (Google) आजपासून कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) करणारे सर्व  Android Apps बंद केले आहेत. युजर्सची प्रॉयव्हसी लक्षात घेता गुगलने हा निर्णय घेतला आहे. Call Recording करणारे अ‍ॅप्स एक्सेबिलीटी API चा वापर करतात. यामुळे अॅप्सना अनेक प्रकारे परवानगी मिळते. याचा वापर चुकीच्या पद्धतीने अनेक डेव्हलपर्स करतात, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र, Call Recording करणारे Android Apps बंद झाले म्हणजे, याचा अर्थ असा नाही की. हे फीचर बंद होत आहे. ज्या स्मार्टफोन्समध्ये पहिल्यापासून हे फीचर उपलब्ध आहे, ते वापरू शकतात. सध्या जास्तकरून स्मार्टफोन्स या फीचरसोबत मार्केटमध्ये येत आहेत. 

म्हणजेच तुम्ही फोनच्या इनबिल्ट फीचरचा वापर करून आता Android स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्डिंग करू शकता. हे फीचर Xiaomi/ Redmi/ Mi च्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा देण्यात आले आहे. फोन आल्यानंतर तुम्ही रेकॉर्डच्या ऑप्शनवर क्लिक करून कॉल रेकॉर्ड करू शकता.  Samsung सुद्धा आपल्या OneUI सोबत कॉल रेकॉर्डिंगचे फीचर युजर्सला देत आहे. तुम्ही तुमच्या Samsung Galaxy स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट फीचरद्वारे कॉल रेकॉर्ड करू शकता. अशाप्रकारे कॉल Oppo, Poco, OnePlus, Realme, Vivo, Tecno आणि इतर स्मार्टफोन्सवर कॉल रेकॉर्ड करू शकता.  

दुसऱ्या फोनद्वारे रेकॉर्ड करू शकता कॉलजर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डर दिले नाही, तरीही तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता. यासाठी तुम्हाला दुसऱ्या स्मार्टफोनची आवश्यकता भासेल. तुम्ही स्पीकरवर बोलून दुसऱ्या फोनच्या व्हॉइस रेकॉर्डर अ‍ॅपद्वारे कॉल रेकॉर्ड करू शकता. दरम्यान, यामध्ये आवाज क्लिअर येत नाही, काही अडचणी येऊ शकतात. मात्र, इनबिल्ट कॉल रेकॉर्डर नसल्यामुळे ही पद्धत कामी येऊ शकते. तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे कॉल रेकॉर्ड करु शकणार नाही.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल