शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

Apple विरोधात अँड्रॉइड स्मार्टफोन निर्मात्यांची आघाडी; Samsung, Xiaomi, Oppo आणि Vivo आले एकत्र

By सिद्धेश जाधव | Updated: June 21, 2021 16:10 IST

High speed file transfer on Android: Apple च्या एयरड्रॉपला टक्कर देण्यासाठी मोठमोठ्या अँड्रॉइड कंपन्यांनी भागेदारी केली आहे. यात आता सॅमसंगचा समावेश करण्यात आला आहे.

Samsung, Xiaomi, Oppo आणि Vivo मध्ये किती मोठी स्पर्धा आहे हे जगजाहीर आहे, परंतु एका खास सुविधेसाठी या मोठ्या अँड्रॉइड स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या कंपन्या एकत्र आल्या आहेत. या कंपन्यांनी मोबाईल टू मोबाईल हाय स्पीड फाईल शेयरिंगसाठी हात मिळवणी केली आहे. यापूर्वी 2019 मध्ये Oppo, Vivo आणि Xiaomi ने पियर टू पियर ट्रांसमीशन अलाइंस बनवली होती, ज्यात त्यांनी फाईल शेयरिंगसाठी ग्लोबल प्रोटोकॉल बनवण्याचा मुद्दा प्रस्तावित केला होता. आता या आघाडीत Samsung चा समावेश झाला आहे. यामुळे Vivo, Oppo आणि Xiaomi फोनवरून Samsung फोनवर हाय स्पीड फाईल ट्रांसफर करता येईल. 

2019 मध्ये Peer-to-Peer Transmission Alliance मध्ये फक्त Xiaomi, Oppo आणि Vivo अश्या तीनच कंपन्या होत्या. त्यानंतर OnePlus, Realme, Meizu आणि Black Shark सह इतर कंपन्या यात सहभागी झाल्या. त्यानंतर आलेल्या ZTE आणि Asus नंतर आता दक्षिण कोरियातील सॅमसंगचे नाव यात जोडले गेल्यामुळे हि आघाडी मजबूत झाली आहे.  

या सर्व मोठमोठ्या कंपन्या एकत्र येण्यामागचे कारण म्हणजे Apple डिवाइसमधील एयरड्रॉप सर्विस. या सर्विसमध्ये अ‍ॅप्पलच्या कोणत्याही डिवाइसवरून दुसऱ्या अ‍ॅप्पल डिवाइसवर अत्यंत वेगाने फाईल ट्रांसफर करता येते. या सर्व्हिसला गुगुलच्या ‘नियरबाय‘ सर्व्हिसकडून टक्कर मिळते.  

या समूहात सहभागी झाल्यानंतर आता सॅमसंग डिवाइसवरून समूहातील इतर कंपन्यांच्या डिवाइसवर 20 एमबीपीएसच्या स्पीडने डेटा ट्रांसफर करता येईल. हि टेक्नॉलॉजीमध्ये डिवाइस पेयर करण्यासाठी ब्लूटूथचा वापर केला जाईल, परंतु डेटा ट्रांसफरसाठी वायफायचा वापर करण्यात येईल.  

टॅग्स :samsungसॅमसंगxiaomiशाओमीoppoओप्पोVivoविवो