डबल फास्ट चार्जिंगसह Samsung Galaxy Z Flip3 होऊ शकतो सादर; 11 ऑगस्टला होणार लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 01:09 PM2021-07-31T13:09:11+5:302021-07-31T13:12:03+5:30

Samsung Galaxy Z Flip3 charging: Samsung Galaxy Z Flip3 मध्ये दोन फास्ट चार्जिंग चार्जर असल्याची माहिती समोर आली आहे.  

Samsung galaxy z flip3 get 3c certifications it will come with dual fast charging support  | डबल फास्ट चार्जिंगसह Samsung Galaxy Z Flip3 होऊ शकतो सादर; 11 ऑगस्टला होणार लाँच 

डबल फास्ट चार्जिंगसह Samsung Galaxy Z Flip3 होऊ शकतो सादर; 11 ऑगस्टला होणार लाँच 

Next

काही दिवसांपूर्वी सॅमसंगने आपल्या ‘Galaxy Unpacked’ इव्हेंटची घोषणा केली होती. हा इव्हेंट 11 ऑगस्टला होणार आहे आणि या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी Galaxy Z Flip 3 आणि Galaxy Z Fold3 असे दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स सादर करू शकते. आता लाँचपूर्वी हे फोन चीनमध्ये 3C सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाले आहेत. 3C लिस्टिंगमध्ये समजले आहे कि Z Flip3 फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.  

Samsung Galaxy Z Flip3 याआधी देखील मॉडेल नंबर SM-F7110 सह 3C वेबसाईटवर दिसला होता. तेव्हा या स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग असेल अशी माहिती मिळाली होती. परंतु नवीन लिस्टिंगमधून हा डिवाइस मॉडेल नंबर EP-TA200 आणि EP-TA800 अश्या दोन चार्जरला सपोर्ट करेल, असे समजले आहे. यापैकी एक चार्जर 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल तर दुसरा 25W रॅपिड फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाईल. यापैकी 15W स्पीड असलेला चार्जर फोनच्या बॉक्समध्ये मिळेल, अशी चर्चा आहे.  

Samsung Galaxy Z Flip3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy Z Flip3 मध्ये 6.7 इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले देण्यात येईल. त्याचबरोबर फोनमध्ये 1.9-इंचाचा डिस्प्ले कव्हरवर दिला जाईल. या फोल्डेबलमध्ये आतल्या बाजूस 10MP चा सेल्फी कॅमेरा आणि बॅक पॅनलवर 12MP-12MP चे दोन कॅमेरे असतील. Galaxy Z Flip3 स्मार्टफोन 3,300mAh च्या बॅटरीला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये Snapdragon 888 चिपसेट असेल, सोबत 8GB रॅम आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज दिली जाऊ शकते.  

Web Title: Samsung galaxy z flip3 get 3c certifications it will come with dual fast charging support 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.