शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

सॅमसंग फॅन्सना मिळणार सरप्राईज; कंपनीने केली Galaxy Unpacked Part 2 इव्हेंटची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Published: October 14, 2021 2:54 PM

Samsung Galaxy Unpacked Part 2 Launch Event: सॅमसंगने “Galaxy Unpacked Part 2” इव्हेंटची घोषणा केली आहे. या इव्हेंटमधून कंपनी मिडरेंज स्मार्टफोन सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सॅमसंगने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देत “Galaxy Unpacked Part 2” इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट 20 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटमधून कोणते प्रोडक्ट बाजारात येतील याची माहिती मात्र सॅमसंगने अजूनतरी सांगितलेली नाही. विशेष म्हणजे 18 तारखेला Apple तर 19 तारखेला Google ने लाँच इव्हेंटचे आयोजन केले आहे.  

काही दिवसांपूर्वी टिपस्टर Jon Prosser ने Samsung Galaxy S21 FE च्या लाँच डेटची माहिती दिली होती. या लीकनुसार हा फोन ऑक्टोबरला प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. त्यांनतर आठवड्यानंतर 29 तारखेला हा फोन विकत घेता येईल. कदाचित 20 ऑक्टोबरच्या Galaxy Unpacked Part 2 इव्हेंटमधून Samsung Galaxy S21 FE सादर केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी या फोनचे सपोर्ट पेज देखील सॅमसंग जर्मनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आले होते.  

Samsung Galaxy S21 FE 

लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा पंच होल डिजाईन असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट मिळू शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 660 जीपीयू मिळेल. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो. यात अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वन युआय 3.1.1 मिळेल. सिक्योरिटीसाठी डिवाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी Samsung Galaxy S21 FE मध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.  

 

टॅग्स :samsungसॅमसंगAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान