शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Samsung Galaxy S23: सॅमसंगचा आजवरचा सर्वात पावरफुल फोन, तब्बल 200MP कॅमेरा; या दिवशी होणार लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 16:22 IST

नव्या वर्षाच्या सुरुवातीसोबतच नव्या स्मार्टफोन्सच्या लॉन्चची माहिती देखील समोर आली आहे.

नवी दिल्ली-नव्या वर्षाच्या सुरुवातीसोबतच नव्या स्मार्टफोन्सच्या लॉन्चची माहिती देखील समोर आली आहे. यंदाच्या वर्षात आपल्याला अनेक स्मार्टफोन कंपन्यांचे फ्लॅगशिप डिवाइस पाहायला मिळतील. यातील एक फ्लॅगशीप सीरिज Samsung Galaxy S23 आहे. या सीरिजची अनेक जण आतुरतेनं वाट पाहात आहेत. तसंच या सीरिजच्या लॉन्चबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. 

आता सॅमसंगच्या या सीरिजच्या अधिकृत लॉन्चिंगची तारीख समोर आली आहे. १ फेब्रुवारी रोजी सॅमसंगच्या गॅलेक्सी एस २३ सीरिजचे फोन लॉन्च होणार आहेत. सॅमसंग कोलंबियाच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली आहे. फोन बाबत अद्याप जास्त माहिती मिळू शकलेली नसली तरी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या सीरिजमध्येही गेल्या वर्षीप्रमाणेच तीन नवे स्मार्टफोन पाहायला मिळू शकतात. 

पुढील महिन्यात लॉन्च होणार सर्वात तगडा फोनGalaxy Unpacked इव्हेंटची पुढील महिन्याची पहिली तारीख निश्चित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या नव्या स्मार्टफोन सीरिजबाबतची माहिती लिक होत होती. टीझरमध्ये नव्या फोनचा जबरदस्त कॅमेरा सेटअप पाहायला मिळत आहे. 

नुकतंच सॅमसंगनं गॅलेक्सी एस २३ आणि गॅलेस्की एस २३ अल्ट्राचा लूक समोर आला होता. हे स्मार्टफोन कॉटन फ्लॉवर, Mistly Lilac, Botanic Green आणि फँटम ब्लॅक अशा रंगात उपलब्ध होणार आहेत. 

असे असू शकतात फिचर्स-रिपोर्ट्सनुसार सॅमसंगच्या नव्या सीरिज फोनमध्ये तब्बल 200MP कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. जो सीरिजच्या अल्ट्रा व्हेरिअंटमध्ये पाहायला मिळेल. याशिवाय S23 Plus आणि S23 मध्ये 50MP चा मेन लेन्स पाहायला मिळू शकतो. 

तिन्ही स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर पाहायला मिळू शकतो. कंपनीच्या काही रिजनमध्ये हँडसेटला Exynos प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो. सीरिजच्या डिझाइनमध्येही फार काही बदल पाहायला मिळणार नाहीत. अर्थात सॅमसंगनं अद्याप अधिकृतरित्या फोनचे फिचर्स आणि डिझाइनबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोन