शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सॅमसंगचा स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात; Galaxy S21 FE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 19:56 IST

Samsung Galaxy S21 FE Launch: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन Google Play Console वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या टोन डाऊन सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन फोल्डेबल स्मार्टफोन्स सोबत लाँच होणार होता, असे काही रिपोर्ट्समधून समोर आले होते. परंतु तसे झाले नाही, आता हा स्मार्टफोन Google Play Console वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या टोन डाऊन सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. चला जाणून घेऊया Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनचे लीक स्पेसिफिकेशन्स.  

Samsung Galaxy S21 FE संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

MyFixGuide ने दिलेल्या माहितीनुसार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले पंच होल डिजाईनसह सादर केला जाईल. प्रोसेसिंगच्या बाबतीत या स्मार्टफोनचे फ्लॅगशिप स्टेटस दिसून येते. Galaxy S21 FE मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC देण्यात येईल. तसेच फोनमध्ये 6GB RAM आणि Adreno 660 GPU मिळू शकतो.  

Samsung Galaxy S21 FE च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनमध्ये 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तळाला स्पिकर ग्रिल, सिम ट्रे आणि USB Type-C पोर्ट देण्यात येईल. तर डाव्या पॅनलवर पावर बटण असेल. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. 

टेना लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy S21 FE मध्ये 6.4-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लिस्टिंगमधून 4,370 mAh च्या बॅटरीची माहिती समोर आली आहे. अलीकडेच समोर आलेल्या FCC आणि 3C सर्टिफिकेशनच्या लिस्टिंगनुसार फोनमध्ये क्रमशः 45 वॉट आणि 25 वॉट फास्ट चार्जिंग असू शकते. गीकबेंचवर Samsung Galaxy S21 FE स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर आणि 8GB रॅमसह लिस्ट झाला होता.   

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड