शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

असा असेल Samsung Galaxy S10 Lite स्मार्टफोन; फीचर्स आणि किंमत लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 13:07 IST

Samsung Galaxy S10 lite या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंचाचा Infinity-O-display मिळणार आहे. तसेच पंच होल डिस्प्लेसोबतच फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S10 lite मध्ये एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल.

ठळक मुद्देSamsung Galaxy S10 lite या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंचाचा Infinity-O-display मिळणार आहे. Samsung Galaxy S10 lite मध्ये एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल. स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅमसह Qualcomm Snapdragon 855 SoC प्रोसेसर किंवा Exynos 9820 SoC प्रोसेसर देण्यात येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - सॅमसंग ही कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन दर्जेदार स्मार्टफोन लाँच करत असते. लवकरच सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची नवी गॅलेक्सी S10 सीरिज आणणार आहे. या फ्लॅगशिप सीरिजमध्ये कंपनी एकदम दोन स्मार्टफोन लाँच करत आली आहे. मात्र यावेळी सॅमसंग S10 सीरिज अंतर्गत एकदम तीन मॉडेल लाँच करणार आहे. यात Samsung Galaxy S10, Samsung Galaxy S10+ आणि Samsung Galaxy S10 lite या मॉडेल्सचा समावेश असणार आहे.

Samsung Galaxy S10 lite या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंचाचा Infinity-O-display मिळणार आहे. तसेच पंच होल डिस्प्लेसोबतच फ्रंट कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy S10 lite मध्ये एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल. तसेच स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअपसह 3,100 एमएएचची बॅटरी देण्यात येईल. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅमसह Qualcomm  Snapdragon 855 SoC प्रोसेसर किंवा Exynos 9820 SoC प्रोसेसर देण्यात येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, black, blue, green, yellow and white अशा पाच रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. तसेच साधारण Samsung Galaxy S10 lite ची किंमत 60,500 रुपये असू शकते. Samsung Galaxy S10 सीरिजचं लाँचिंग फेब्रुवारीत होणाऱ्या Mobile World Congress 2019 च्या आसपास होण्याची शक्यता आहे. याआधीच तिन्ही स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता आणि डिस्प्ले साइझसह अन्य फीचर्स सर्वत्र लीक झाली आहेत. 

Samsung Galaxy S10 lite आधी Samsung Galaxy S10 चे फीचर लीक झाले आहेत. Samsung Galaxy S10 मध्ये पंच होल डिस्प्लेसोबत इन डिस्प्ले फ्रन्ट कॅमेरा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा 120 अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy S10 मध्ये Exynos 9820 Soc प्रोसेसर किंवा Snapdragon 855 Soc प्रोसेसर आणि 6.4 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्याची शक्यता आहे.  Samsung Galaxy S10+ मध्ये पंच होल डिस्प्लेसोबतच ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप देण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल