शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 555 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G स्मार्टफोन; जाणून घ्या Samsung Galaxy F23 ची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: March 15, 2022 19:37 IST

Samsung Galaxy F23 5G Price In India: Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन भारतात 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.

Samsung Galaxy F23 5G Price In India: Samsung नं काही दिवसांपूर्वी आपला स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. या फोनचा पहिला सेल उद्यापासून सुरु होणार आहे. 16 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन Flipkart Big Saving Days सेलमध्ये विक्रीसाठी येईल. या फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्स देखील मिळत आहेत. चला जाणून घेऊया Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनचे स्पेक्स आणि किंमत.  

Samsung Galaxy F23 5G ची किंमत आणि ऑफर्स  

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 15999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 16 मार्चपासून हा फोन सॅमसंग शॉप आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतगर्त ICIC बँक क्रेडिट कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच एसबीआयच्या कार्ड धारकांना 750 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळत आहे. तुम्ही हा फोन फक्त 555 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेऊ शकता.  

Samsung Galaxy F23 5G चे स्पेसिफिकेशन्स 

कमी बजेटमध्ये देखील Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन दमदार स्पेक्ससह बाजारात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित सॅमसंगच्या One UI 4.1 वर चालतो. कंपनीनं यात क्वालकॉमच्या Snapdragon 750G चिपसेटचा वापर केला आहे. सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. सोबत 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. यातील पावर कुल टेक्नॉलॉजी गेमिंग परफॉर्मन्स सुधारते.  

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंगनं 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  

कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल बँड वायफाय, Bluetooth 5.0, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. यात अन्य 5G फोन्स प्रमाणे यात एक-दोन बँड्स मिळत नाहीत तर हा फोन 12 बँड्सना सपोर्ट करतो. Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान