Samsung Galaxy F22 लवकरच येईल भारतात; कंपनीच्या साइटवर आली माहिती 

By सिद्धेश जाधव | Published: June 18, 2021 04:45 PM2021-06-18T16:45:46+5:302021-06-18T16:50:10+5:30

Samsung Galaxy F22 Launch: Samsung Galaxy F22 चा मॉडेल नंबर SM-E225F/DS आहे. 

Samsung galaxy f22 support page live india launch soon  | Samsung Galaxy F22 लवकरच येईल भारतात; कंपनीच्या साइटवर आली माहिती 

Samsung Galaxy F22 लवकरच येईल भारतात; कंपनीच्या साइटवर आली माहिती 

Next

गेले कित्येक दिवस Samsung Galaxy F22 च्या बातम्या येत आहेत. हा फोन गॅलेक्सी A22 चा रीब्रँडेड व्हर्जन असेल, असे अनेक रिपोर्ट्स समोर आले होते. आता या आगामी स्मार्टफोनचा सपोर्ट पेज सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर लाईव्ह झाला आहे, हि माहिती टेक वेबसाइट Mysmartprice ने सर्वप्रथम दिली आहे. सपोर्ट पेज समोर आल्यामुळे हा फोन लवकरच लाँच होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Samsung Galaxy F22 listed on Samsung India website)  

Samsung Galaxy F22 चा सपोर्ट पेज 

सॅमसंग इंडियाच्या सपोर्ट पेजवरील माहितीनुसार, गॅलेक्सी F22 चा मॉडेल नंबर SM-E225F/DS आहे. याव्यतिरीक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु या आठवड्यात गॅलेक्सी F22 फोन ब्लूटूथ SIG वर दिसला होता. या लिस्टिंगनुसार, हा फोन गॅलेक्सी A22 चा रीब्रँडेड व्हर्जन असेल असे समजते.  

Samsung Galaxy A22 4G चे स्पेसिफिकेशन्स  

सॅमसंग गॅलेक्सी ए22 4G व्हेरिएंटबाबत बोलायचे तर, यात 6.4-इंचाचा AMOLED HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. या व्हेरिएंटमध्ये MediaTek Helio G80 SoC सह 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेजचे ऑप्शन देण्यात आले आहेत.   

फोटोग्राफीसाठी फोनमधील क्वाड कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेंसर, दोन 2-मेगापिक्सलचे डेप्थ आणि मॅक्रो सेंसर आहेत. फोनमधील सेल्फी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा डिवाइस Violet, Mint, Black आणि White मध्ये रंगात उपलब्ध होईल. या अँड्रॉइड 11 आधारित फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.   

Samsung Galaxy A22 5G चे स्पेसिफिकेशन्स  

या डिवाइसचा 5G व्हेरिएंट 6.6-इंचाच्या Full HD+ IPS एलसीडी डिस्प्लेसह येतो. फोन MediaTek Dimensity 700 5G SoC ने सुसज्ज आहे. Samsung Galaxy A22 5G मध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4GB रॅम +128GB स्टोरेज, 6GB रॅम+128GB स्टोरेज आणि 8GB रॅम +128GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी फोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहेत. फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे.  

Samsung Galaxy A22 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंगसह येते. डिवाइस अँड्रॉइड 11 बेस्‍ड वन युआय 3.0 वर चालतो.   

Samsung Galaxy A22 5G आणि Galaxy A22 4G ची किंमत  

अजूनतरी Samsung Galaxy A22 5G आणि Galaxy A22 4G च्या किंमतीची माहिती कंपनीने सांगितली नाही. परंतु, अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार गॅलेक्सी A22 5G ची किंमत €185 (जवळपास 16,487 रुपये) असेल जी फोनच्या 64GB व्हेरिएंटची किंमत असू शकते. हि बातमी खरी ठरल्यास हा फोन सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G फोन असेल. 

Web Title: Samsung galaxy f22 support page live india launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.