शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेडमी वाय 1आणि वाय 1 लाईटची आजपासून विक्री सुरू : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Updated: November 9, 2017 15:51 IST

शाओमी कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या रेडमी वाय१ आणि वाय लाईट या दोन स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू होत आहे.

शाओमी कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या रेडमी वाय१ आणि वाय लाईट या दोन स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू होत आहे.शाओमी रेडमी वाय १ हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज तसेच ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज या दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे १०,९९९ आणि ८,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. तर रेडमी वाय १ लाईट हा स्मार्टफोन ६,९९९ रूपये मूल्यात मिळेल. हे दोन्ही स्मार्टफोनची आज दुपारी १२.०० वाजेपासून शाओमी कंपनीच्या मी.कॉम आणि अमेझॉन इंडिया या पोर्टलवरून विक्री सुरू होत असून ग्राहकांना हे मॉडेल्स ऑफलाईन पध्दतीनेही खरेदी करता येतील.शाओमी रेडमी वाय १ या मॉडेलमध्ये सेल्फी लाईटसह १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण असेल. यात ६४ बीट ऑक्टॉ-कोई क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर आहे. या मॉडेलचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम.६४ जीबी स्टोअरेज या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा असेल. यातील बॅटरी ३०८० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.  शाओमी रेडमी वाय १ लाईट या मॉडेलमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा थोड्या कमी प्रमाणात फिचर्स देण्यात आले आहेत. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर असेल. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने याला वाढविण्याची सुविधा असेल. तर यातील सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा तर रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील उर्वरित फिचर्स हे रेडमी वाय १ या मॉडेलप्रमाणेच असतील. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित एमआययुआर ८ वर चालणारे असतील. 

टॅग्स :xiaomiशाओमी