शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

2022 मधील सर्वात असुरक्षित ब्राउझर Google Chrome, रिपोर्टमधून दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:05 IST

Chrome most unsafe browser in 2022 : ही आकडेवारी VulDB vulnerability डेटाबेसमधील डेटावर आधारित आहे, जी 1 जानेवारी 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे, असा दावा रिपोर्टमध्ये केला आहे. 

नवी दिल्ली :  गुगल क्रोम (Google Chrome) हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे वेब ब्राउझर आहे. नवीन रिपोर्टनुसार, 2022 चा सर्वात असुरक्षित ब्राउझर गुगल क्रोम असल्याचे सांगण्यात येत आहे. अलटस व्हीपीएनच्या रिपोर्टनुसार, क्रोम ब्राउझरमध्ये आतापर्यंत एकूण 3,159 सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. ही आकडेवारी VulDB vulnerability डेटाबेसमधील डेटावर आधारित आहे, जी 1 जानेवारी 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे, असा दावा रिपोर्टमध्ये केला आहे. 

ऑक्टोबरच्या पहिल्या पाच दिवसांत क्रोम ब्राउझरमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अलीकडे या ब्राउझरमध्ये CVE-2022-3318, CVE-2022-3314, CVE-2022-3311, CVE-2022-3309 आणि CVE-2022-3307 सुरक्षा त्रुटी आढळल्या. CVE प्रोग्राम अनेक प्लॅटफॉर्मवर सुरक्षा त्रुटी आणि कमतरता यांचा ट्रॅक करत असते. डेटाबेस अद्याप या त्रुटींबद्दल माहिती सूचीबद्ध करत नाही. पण या सुरक्षेतील त्रुटींमुळे कॅम्प्युटकरची मेमरी खराब होऊ शकते, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, युजर्स गुगल क्रोम व्हर्जन 106.0.5249.61 वर अपडेट करून ते ठिक करू शकतात. सुरक्षेच्या त्रुटींचा विचार केल्यास, गुगल क्रोमनंतर मोझिला फायरफॉक्स (Mozilla Firefox), मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge), अॅपल सफारी (Apple Safari) आणि ओपेरा (Opera) यांचा नंबर लागतो. मोझिलाचे फायरफॉक्स ब्राउझर असुरक्षिततेसाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

05 ऑक्टोबरपर्यंत, मायक्रोसॉफ्ट एजमध्ये 103 सुरक्षा त्रुटी आढळल्या होत्या, ज्या 2021 च्या पूर्ण वर्षाच्या तुलनेत 61 टक्के अधिक आहेत. रिलीज झाल्यापासून एकूण 806 सुरक्षा त्रुटी त्यात आढळून आल्या आहेत. यानंतर सफारी ब्राउझर आहे, ज्यामध्ये काही खालच्या स्तरावर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. तर ओपेरा ब्राउझरमध्ये 2022 मध्ये आतापर्यंत कोणतीच सुरक्षा त्रुटी आढळली  नाही. मे 2022 पर्यंत सफारी ब्राउझरचा वापर एक अब्जहून अधिक युजर्सनी केला आहे. 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान