शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या 'या' अ‍ॅप्सबद्दल तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या रिसर्च.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 12:22 IST

सध्याच्या काळात लोकांना जगातल्या कोणत्याही नात्यापेक्षा स्वतःचा मोबाईल महत्वाचा असतो.

(Image credit- voicendata.com)

सध्याच्या काळात  लोकांना जगातल्या कोणत्याही नात्यापेक्षा स्वतःचा मोबाईल महत्वाचा असतो. कोणत्याही ठिकाणी असतील तरी लोकं मोबाईलवर सगळ्यात जास्त वेळ घालवत असतात. याच विषयाशी निगडीत एक रिसर्च रिर्पोट समोर आला आहे. या रिर्पोटनुसार भारतातील मोबाईलचे वापरकर्ते मोबाईल वापरण्यासाठी वर्षाचे ७५ तास वापरत असतात. तसंच भारताताल लोकांचा रोजचा वापर ५  ते 6  तासांचा असतो इतका वेळ सोशल मिडीयावर एक्टीव्ह असतात.

मागील काही वर्षात असे काही अ‍ॅप्स लॉन्च झाले आहेत. ज्या अ‍ॅप्सनी लोकांच्या आयुष्यात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. तसंच अनेक अ‍ॅप्स असे सुद्धा आहेत ज्यांचा वापर करून युजर्स पैसे कमावत आहेत. तसंच आपलं करीअर म्हणून त्यांनी सोशल मिडीया निवडले असून आता युजर्स कन्टेंट निर्माण करत आहे. त्यामुळे  माध्यामांचा वापर तुफान केला जातो. चला तर मग जाणून घेऊया या अ‍ॅप्लिकेशन्सबद्दल.

इंन्स्टाग्राम

इंन्स्टाग्राम  या अ‍ॅप्लिकेशनचा वापर भारतातील लाखो लोक करतात. हे अ‍ॅप २०१० मध्ये लॉंन्च करण्यात आलं. दोन वर्षांनंतर फेसबूकने विकत घेतले. या रिर्पोटनुसार दररोज ५० करोड युजर्स रोज या अ‍ॅपवर आपले फोटो, व्हिडीओ आणि शॉर्ट फिल्मस पोस्ट करत असतात.

व्हाट्सअ‍ॅप

२००९ मध्ये व्हाट्सअ‍ॅप सोशल मिडियावर प्रचलीत झाले. तसंच २०१० मध्ये या अ‍ॅपला लोकप्रियता प्राप्त झाली. आणि हे सुरुवातीला फक्त चॅटींगपूरता मर्यादित होतं. परंतू  नंतर वेगवेगळे फिचर्स अ‍ॅड होत गेले. आजकाल व्हाट्सअ‍ॅप स्टेटस आणि त्यातल्या इतर फिचर्सचा वापर करून  लोकांना कमाईचे साधन उपलब्ध झाले आहे.

फेसबूक मॅसेंजर 

फेसबूकचा वापर करून सध्याच्या काळात अनेक गोष्टी केल्या जातात. २०११ मध्ये फेसबूक नवीन फिचर्ससह प्रचलीत झाले. यात अनेकांनी आपले कलागुण दाखवत व्हिडीओज पोस्ट करून त्याआधारे प्रसिद्धी मिळवली आणि स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. तसंच सगळ्यात जास्त व्हिडीओज आणि पोस्ट फेसबूकला पाहिल्या जातात. 

टिकटॉक

२०१७ मध्ये बाईट डान्स याने हे अ‍ॅप लॉंन्च  केले. कमी वेळात या अ‍ॅपला जवळपास ५० करोडपेक्षा जास्त युजर्स मिळाले. या माध्यामातून अनेक अ‍ॅक्टींगप्रमींनी आपल्या आवडत्या संगीताचा आणि डायलॉग्सचा पाऊस पाडला. सध्याच्या घडीला टिकटॉकचा वापर मनोरंजनाचं माध्यम म्हणून करत असलेल्यांची संख्या तर जास्त आहेच पण या माध्यामातून कमाई  करणारे लोक सुद्दा भरपूर मोठ्या प्रमाणावर आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान