शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
2
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
3
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
4
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
5
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
6
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
7
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
8
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
9
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
10
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
11
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
12
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
13
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
15
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
16
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
17
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
18
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
19
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
20
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 21:02 IST

Reliance Jio 9 Years Celebration plans: कंपनीने पहिल्यांदा फोरजी लाँच करत आधीपासून दादागिरी करत असलेल्या सर्व कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. आता रिलायन्स जिओ या क्षेत्रातील दादा झाली असून रिचार्ज प्लॅन  वाढवत चालली आहे.

रिलायन्स जिओने भारतात टेलिकॉम सेवा सुरु करून ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कंपनीने पहिल्यांदा फोरजी लाँच करत आधीपासून दादागिरी करत असलेल्या सर्व कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. आता रिलायन्स जिओ या क्षेत्रातील दादा झाली असून रिचार्ज प्लॅन  वाढवत चालली आहे. अशातच जिओ कंपनीने ९ वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने तसेच ५० कोटी ग्राहकांचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन सुरु केले आहे. 

या अंतर्गत जिओ आपल्या युजरना कोणताही प्लॅन असला तरी ३ दिवसांचा अनलिमिटेड डेटा देणार आहे. तसेच ज्या ग्राहकांकडे ४ जी फोन आहे त्यांनाही ३९ रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा देणार आहे. 

५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या विकेंडला जिओ तीन दिवस अनलिमिटेड फाईव्ह जी इंटरनेट देणार आहे. ज्या ग्राहकांनी ४जी रिचार्ज केले आहे व ज्यांच्याकडे ५जी फोन आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे. एवढेच नाही तर १२०० रुपयांमध्ये २ महिन्यांचे नवीन जिओहोम कनेक्शन दिले जाणार आहे. यामध्ये १०००+ टीव्ही चॅनेल, ३० एमबीपीएस अमर्यादित डेटा, १२+ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन (जिओहॉटस्टार + इतर), ४के स्मार्ट सेट टॉप बॉक्स आदी दिले जाणार आहे. 

एवढेच नाही तर ज्या ग्राहकांनी गेले १२ महिने सलग ३४९ रुपयांचे रिचार्ज केलेले आहे, त्यांना १३ वा महिना मोफत दिला जाणार आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात या ग्राहकांना ३४९ चे ५जी अनलिमिटेड प्लॅनसाठी रिचार्ज करावे लागणार नाहीय. 

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ