शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

Jio Gigafiber launch: मोफत TV, प्लॅन आणि ऑफर..., जाणून घ्या, काय आहे खास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 19:54 IST

रिलायन्स जिओचा सुरुवातीचा प्लॅन Bronze आहे.

नवी दिल्ली : रिलायन्सजिओ होम ब्रॉडबँड सर्व्हिस गिगाफायबर (Gigafiber) गुरुवारी लाँच करण्यात आली. जिओच्या या गिगाफायबरचे रेंटल प्लॅन हे 699 रुपयांपासून 8,499रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 Mbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तर 8,499रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1Gbps पर्यंत इंटरनेटचा स्पीड मिळणार आहे.   

गोल्ड प्लॅनचे मासिक भाडे 3,999 रुपये आहे. यापुढील डायमंड प्लॅन आहे, त्याचे मासिक मासिक भाडे 2499 रुपये आहे. तर प्लॅटिनम प्लॅनचे मासिक भाडे 3999 रुपये आहे. तर सर्वाधिक महागडा प्लॅन टायटॅनिअम असून याचे मासिक भाडे 8999 रुपये आहे. या सर्व गोल्ड ते टायटॅनिअम प्लॅनमध्ये ग्राहकाला 4K टीव्ही मोफत मिळणार आहे.

699 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळणार?रिलायन्स जिओचा सुरुवातीचा प्लॅन Bronze आहे. यामध्ये ग्राहकाला 100 mbps पर्यंत इंटरनेट मिळणार आहे. अनलिमिटेड डेटा  (100GB+50GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. यामध्ये फ्री व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना फायदा होणार आहे. म्हणजेच, ग्राहक भारतातील कोणत्याही नंबरवर कॉल करु शकतात.

849 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय असणार?849 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना  100 mbps इंटरनेट स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (200GB+200GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. याशिवाय फ्री व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. तसेच, ग्राहकांना भारतातील कोणत्याही नंबरवर कॉल करता येणार आहे. शकतात.

1,299 रुपयांच्या प्लॅमध्ये मिळणार मोफत टीव्हीजिओच्या 1,299 रुपयांच्या गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना 250 mbps स्पीडचे इंटरनेट मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (500GB+250GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. याशिवाय, मोफत व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 4K स्मार्ट टीव्ही मिळणार आहे.

2,499 रुपयांचा मासिक प्लॅनरिलायन्स जिओच्या 2,499 रुपयांच्या डायमंड प्लॅनमध्ये ग्राहकांना 500 mbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिडेट डेटा  (1250 GB+250GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. यात ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा होणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 24 इंचाचा एचडी टीव्ही मिळणार आहे.

3,999 रुपयांचा प्लॅनमध्ये 1Gbps चे इंटरनेट स्पीडरिलायन्स जियोच्या 3,999 रुपयांचया प्लॅटिनम प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 1Gbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना अनलिमिडेट डेटा  (2500 GB) मिळणार आहे. यात ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा होणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 32 इंचाचा एचडी टीव्ही मिळणार आहे.

8,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 43 इंचाचा टीव्हीरिलायन्स जियोच्या 8,499 रुपयांचया प्लॅटिनम प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना  1Gbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये 43 इंचाचा 4K टीव्ही मिळणार आहे. यात टीव्हीची किंमत  MRP 44,990 रुपये आहे. तसेच, यामध्ये ग्राहकांना एक महिन्यासाठी 5000 GB डेटा मिळणार आहे.   

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्स