शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त ठरला! याच महिन्यात येतोय शानदार Redmi Note 11T 5G Phone भारतात; किंमत देखील आली समोर  

By सिद्धेश जाधव | Updated: November 15, 2021 19:04 IST

Xiaomi Redmi Note 11T 5G India Launch Date and Price: Redmi Note 11T 5G Phone याच महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

शाओमी इंडियाने Redmi Note 11T 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. हा फोन भारतात 30 नोव्हेंबरला लाँच केला जाणार आहे. याची माहिती कंपनीने आपल्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. आगामी रेडमी फोनसाठी एक मायक्रो साईट देखील लाईव्ह करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा चीनमध्ये आलेल्या Redmi Note 11 5G स्मार्टफोनचा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. त्यामुळे या दोन्ही फोन्सच्या स्पेक्समध्ये जास्त अंतर दिसणार नाही. Redmi Note 11T 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचसह या फोनची किंमत देखील समोर आली आहे.  

Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. रेडमी नोट 11 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा डेप्थ सेन्सर आलेला रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.   

Redmi Note 11T 5G ची संभाव्य किंमत 

मीडिया रिपोर्ट्सनुसार Redmi Note 11T 5G स्मार्टफोन भारतात 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. ही 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत असू शकते. या मोबाईलचे 6GB/128GB आणि 8GB/128GB स्टोरेज व्हेरिएंट अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपयांमध्ये सादर केले जाऊ शकतात, अशी माहिती मनी कंट्रोलने दिली आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान