108MP कॅमेरा आणि शक्तिशाली चिपसेटसह Redmi K50 Pro Plus येऊ शकतो बाजारात  

By सिद्धेश जाधव | Published: October 8, 2021 03:11 PM2021-10-08T15:11:43+5:302021-10-08T15:11:54+5:30

Upcoming Flagship Android Phone Redmi K50 Pro Plus: Redmi K50 सीरिजमधील Redmi K50 Pro Plus स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.  

Redmi k50 pro plus smartphone will launch with snapdragon 898 and 108mp camera  | 108MP कॅमेरा आणि शक्तिशाली चिपसेटसह Redmi K50 Pro Plus येऊ शकतो बाजारात  

108MP कॅमेरा आणि शक्तिशाली चिपसेटसह Redmi K50 Pro Plus येऊ शकतो बाजारात  

Next

चीनमध्ये स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने Redmi हा एक वेगळा ब्रँड स्थापित केला आहे. या ब्रँड अंतर्गत Redmi K सीरिज ही फ्लॅगशिप म्हणजे सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन सीरिज आहे. आता Redmi K50 series लवकरच बाजारात दाखल होणार आहे. ब्रँडने यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. अधूनमधून या सीरिजचे लिक्स येत असतात. आता Redmi K50 सीरिजमधील Redmi K50 Pro Plus स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.  

Redmi K50 Pro+ स्पेसिफिकेशन्स 

रेडमी के50 सीरीज अंतगर्त कंपनी Redmi K50, Redmi K50 Pro, आणि Redmi K50 Pro+ को लाँच करू शकते. चिनी टिपस्टरने यातील Pro Plus स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. या लीकनुसार Redmi K50 Pro+ स्मार्टफोन पंच होल डिजाईनसह सादर करण्यात येईल. हा पंच होल डिस्प्लेच्या वर्षय बाजूला मध्यभागी असेल. तसेच या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. ज्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.  

तसेच Redmi K50 Pro+ स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा आगामी शक्तिशाली Snapdragon 898 दिला जाऊ शकतो. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात दाखल होऊ शकतो. यातील मुख्य कॅमेरा 108-मेगापिक्सलचा सेन्सर असू शकतो, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे हा पेरिस्कोप झूम लेन्सला देखील सपोर्ट करू शकतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 67W रॅपिड चार्जिंगसह देण्यात येईल, असे लीकमध्ये सांगण्यात आला आहे. Redmi K50 सीरीज 2022 च्या सुरुवातीला बाजारात येऊ शकते.  

Web Title: Redmi k50 pro plus smartphone will launch with snapdragon 898 and 108mp camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.