शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

डिस्काउंटसह Realme च्या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचची विक्री; चार्जिंगविना चालणार 7 दिवस 

By सिद्धेश जाधव | Published: June 28, 2022 1:38 PM

गेल्या आठवड्यात आलेल्या Realme TechLife Watch 100 चा पहिला सेल आज आहे. आज डिस्काउंटसह या डिवाइसची विक्री केली जाणार आहे.  

SpO2 सेन्सर, स्ट्रेस मॉनिटर, स्लिप मॉनिटर, ब्लूटूथ कॉलिंग आणि IP68 सर्टिफिकेशनसह Realme TechLife Watch 100 स्मार्टवॉच सादर करण्यात आलं आहे. रियलमीच्या सब-ब्रँड अंतर्गत आलेल्या या घड्याळाची आजपासून विक्री सुरु होणार आहे. या पहिल्याच सेलमध्ये या डिवाइसची विक्री डिस्काउंटसह केली जाणार आहे. 

Realme TechLife Watch 100 ची विक्री कंपनीच्या वेबसाईट व्यतिरिक्त फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोर्सवरून सुरु होईल. हा घड्याळाची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु फ्लिपकार्टवर 500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीच्या वेबसाईटवर देखील 300 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि 200 रुपयांचा कुपन डिस्काउंट मिळेल.  

Realme TechLife Watch R100 चे स्पेसिफिकेशन्स  

वॉचच्या कडा अ‍ॅल्यूमीनियमच्या आहेत, तर स्ट्रॅप सिलिकॉनचे आहेत. रियलमी टेकलाइफ वॉच आर100 मध्ये 1.32 इंचाचा वर्तुळाकार डिस्प्ले 360×360 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. जो 450nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यातील 100 पेक्षा जास्त वॉच फेस युजर्सना कस्टमाइज लूक देण्यास मदत करतात.  

वॉचमधील 380mAh ची आहे, जी सिंगल चार्जवर 7 दिवसांचा यूसेज देते, असा दावा कंपनीनं केला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वॉचमध्ये Bluetooth v5.2 देण्यात आलं आहे. वॉच IP68 रेटिंगसह येतं, त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून हे सुरक्षित राहतं. 

हे वॉच 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड डिटेक्ट करू शकतं. त्याचबरोबर हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर, ब्लड ऑक्सीजन सेन्सर, स्ट्रेस मॉनिटरिंग सेन्सर, स्लिप मॉनिटरिंग सेन्सर, वॉटर रिमाइंडर आणि फीमेल हेल्थ ट्रॅकिंग असे हेल्थ फीचर्सही मिळतात. हा डेटा Realme Wear अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनवर मिळतो.  

तसेच या वॉचमध्ये कॉल, एसएमएस आणि थर्ड पार्टी अ‍ॅप नोटिफिकेशन असे फीचर्स देखील मिळतात. यात डायल पॅड, इव्हेंट रिमाइंडर, ब्रेथ ट्रेनिंग, वेदर फोरकास्ट, स्टॉपवॉच, टाइमर, अलार्म इत्यादी स्मार्टवॉच फिचर देखील आहेत.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञान