शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

चार्जिंग न करता 7 दिवस वापरता येणार Realme TechLife Watch R100; भारतातील किंमत आहे परवडणारी 

By सिद्धेश जाधव | Updated: June 23, 2022 17:12 IST

Realme TechLife Watch R100 स्मार्टवॉच भारतात शानदार हेल्थ फीचर्ससह सादर करण्यात आलं आहे.  

Realme नं आपल्या टेक लाईफ ब्रँड अंतर्गत नवीन स्मार्टवॉच सादर केलं आहे. Realme TechLife Watch R100 भारतीयांच्या भेटीला आलं आहे. या घड्याळात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर आणि फिमेल हेल्थ मॉनिटर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. यातील बॅटरी सिंगल चार्जवर 7 दिवसांपर्यंतचा बॅकअप देऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.  

Realme TechLife Watch R100 ची किंमत 

Realme TechLife Watch R100 ची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे घड्याळ तुम्ही ब्लॅक आणि ग्रे अशा दोन कलर्समध्ये विकत घेऊ शकता. या रियलमीच्या नव्या स्मार्टवॉचची विक्री 28 जून दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल.  

Realme TechLife Watch R100 चे स्पेसिफिकेशन्स 

वॉचच्या कडा अ‍ॅल्यूमीनियमच्या आहेत, तर स्ट्रॅप सिलिकॉनचे आहेत. रियलमी टेकलाइफ वॉच आर100 मध्ये 1.32 इंचाचा वर्तुळाकार डिस्प्ले 360×360 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. जो 450nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यातील 100 पेक्षा जास्त वॉच फेस युजर्सना कस्टमाइज लूक देण्यास मदत करतात.  

वॉचमधील 380mAh ची आहे, जी सिंगल चार्जवर 7 दिवसांचा यूसेज देते, असा दावा कंपनीनं केला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वॉचमध्ये Bluetooth v5.2 देण्यात आलं आहे. वॉच IP68 रेटिंगसह येतं, त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून हे सुरक्षित राहतं.   

हे वॉच 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड डिटेक्ट करू शकतं. त्याचबरोबर हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर, ब्लड ऑक्सीजन सेन्सर, स्ट्रेस मॉनिटरिंग सेन्सर, स्लिप मॉनिटरिंग सेन्सर, वॉटर रिमाइंडर आणि फीमेल हेल्थ ट्रॅकिंग असे हेल्थ फीचर्सही मिळतात. हा डेटा Realme Wear अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनवर मिळतो.  

तसेच या वॉचमध्ये कॉल, एसएमएस आणि थर्ड पार्टी अ‍ॅप नोटिफिकेशन असे फीचर्स देखील मिळतात. यात डायल पॅड, इव्हेंट रिमाइंडर, ब्रेथ ट्रेनिंग, वेदर फोरकास्ट, स्टॉपवॉच, टाइमर, अलार्म इत्यादी स्मार्टवॉच फिचर देखील आहेत.  

टॅग्स :realmeरियलमीHealthआरोग्य