शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

स्मार्टवॉच नव्हे तर फोनच घेणार हृदयाची काळजी; हार्ट रेट मॉनिटरसह Realme Narzo 50 Pro 5G लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: May 18, 2022 18:44 IST

Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन 8GB रॅम, 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि Dimensity 920 5G प्रोसेसरसह बाजारात आला आहे.  

Realme नं भारतात आपले दोन नवीन 5G स्मार्टफोन मिडरेंज सेगमेंटमध्ये सादर केले आहेत. Realme Narzo 50 Pro 5G आणि Realme Narzo 50 5G मधील प्रो व्हर्जनची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. हा हँडसेट 8GB रॅम, 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि Dimensity 920 5G प्रोसेसरसह बाजारात आला आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सर हार्ट रेट मॉनिटरचे देखील काम करतो.  

Realme Narzo 50 Pro 5G स्पेसिफिकेशन्स 

Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि Corning Gorilla Glass 5 ला सपोर्ट करतो. फोनमधील इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर हार्ट रेट देखील मॉनीटर करतो. कंपनीनं MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसरसह Mali-G68 GPU दिला आहे. यात 8GB पर्यंत रॅम व 5GB व्हर्च्युअल रॅम मिळतो. 128GB पर्यंतची मेमरी देण्यात आली आहे.  

Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एक मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनमध्ये यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W डार्ट चार्जला सपोर्ट करते. जी फक्त 31 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते. Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित realme UI 3.0 वर चालतो. 

Realme Narzo 50 Pro 5G किंमत 

Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. तर वहीं 8GB रॅम व 128GB स्टोरेजस मॉडेलसाठी 23,999 रुपये मोजावे लागतील. हा हँडसेट 26 मेला अ‍ॅमेझॉन आणि रियलमीच्या अधिकृत साईटवर विक्रीसाठी येईल.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन