Realme GT Neo 3 स्मार्टफोनचं 'हॉलिवूड' कनेक्शन; 150W फास्ट चार्जिंगसह भारतात येणार Thunder Edition

By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2022 12:52 PM2022-06-30T12:52:48+5:302022-06-30T12:53:51+5:30

Realme GT Neo 3 स्मार्टफोनच्या स्पेशल एडिशनची घोषणा कंपनीनं केली आहे.  

Realme gt neo 3 150w thor love thunder edition teased by madav sheth in india  | Realme GT Neo 3 स्मार्टफोनचं 'हॉलिवूड' कनेक्शन; 150W फास्ट चार्जिंगसह भारतात येणार Thunder Edition

Realme GT Neo 3 स्मार्टफोनचं 'हॉलिवूड' कनेक्शन; 150W फास्ट चार्जिंगसह भारतात येणार Thunder Edition

Next

Realme नं काही दिवसांपूर्वी आपला नवीन फ्लॅगशिप 150W फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo 3 सादर केला होता. आता या हँडसेटचा नवीन स्पेशल Thunder Edition भारतात लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीचे व्हीपी माधव सेठ यांनी ट्विटरवरून दिली आहे. हा फोन Marvel Studios च्या Thor या सुपर हिरोच्या पावरच्या थीमवर आधारित असेल.  

या हँडसेटच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये जास्त बदल केला जाणार नाही. फक्त फोनची डिजाईन आणि युआय बदलण्यात येईल. Marvel च्या Thor या सुपर हिरो सीरिजमधील नवीन चित्रपट Thor: Love Thunder येत आहे. त्यानिमित्ताने Realme GT Neo 3 150W चा हे स्पेशल Thunder Edition पुढील महिन्यात 10 जुलैला भारतात सादर होईल.  

Realme GT Neo 3 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Neo 3 च्या मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते. 

Realme GT Neo 3 मध्ये अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी माली जी610 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.  

रियलमी जीटी नियो 3 टेक मंचावर 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या पंच-होल पॅनलला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. Realme GT Neo 3 चे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग स्पीडचे दोन मॉडेल आहेत. यातील 4,500एमएएचच्या बॅटरीसह 150वॉट फास्ट चार्जिंग मिळते. तर 5,000एमएएच बॅटरी असलेला मॉडेल 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 

Web Title: Realme gt neo 3 150w thor love thunder edition teased by madav sheth in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.