शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

Realme 8i आणि Realme 8s 5G फोनच्या लाँच डेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या चिपसेटसह येणार भारतात

By सिद्धेश जाधव | Updated: September 2, 2021 17:10 IST

Realme 8s 5G and 8i India launch: 9 सप्टेंबर रोजी एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून Realme 8 Series मध्ये रियलमी 8आय आणि रियलमी 8एस 5जी स्मार्टफोन सादर करण्यात येईल.

ठळक मुद्देRealme 8s 5G मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले 90Hz डिस्प्लेसह देण्यात येईल.9 ऑगस्टला लाँच होणाऱ्या दोन स्मार्टफोन्सपैकी रियलमी 8आय स्वस्त फोन असेल.

Realme लवकरच आपल्या ‘रियलमी 8’ सीरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे. गेले कित्येक दिवस बातम्यांमध्ये असलेले Realme 8i आणि Realme 8s 5G हे दोन फोन भारतीयांच्या भेटीला येत आहेत. आज कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन येत्या 9 सप्टेंबरला भारतात लाँच केले जातील.  

9 सप्टेंबर रोजी एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून Realme 8 Series मध्ये रियलमी 8आय आणि रियलमी 8एस 5जी स्मार्टफोन सादर करण्यात येईल. 9 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी या लाँच इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या वेबसाईटवर करण्यात येईल. त्याचबरोबर यूट्यूब चॅनेल आणि कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून Realme 8i आणि Realme 8s 5G चा लाँच इव्हेंट बघता येईल.  

Realme 8s 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स 

Realme 8s 5G मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले 90Hz डिस्प्लेसह देण्यात येईल. यात कंपनीने नवीन MediaTek Dimensity 810 5G चिपसेटचा वापर करणार आहे. तसेच हा फोन डायनॉमिक रॅम एक्सपान्शन टेक्नॉलॉजी (DRE) ला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते. Realme 8s मध्ये 64MP चा रियर कॅमेरा असल्याचे देखील लीकमधून समजले आहे.  

Realme 8i चे स्पेसिफिकेशन्स 

9 ऑगस्टला लाँच होणाऱ्या दोन स्मार्टफोन्सपैकी रियलमी 8आय स्वस्त फोन असेल. Realme 8i स्मार्टफोनमध्ये  120Hz रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले मिळेल, असे कंपनीने सांगितले आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर दिला जाईल. या चिपसेटसह भारतात येणारा हा पहिला फोन आहे. रियलमी 8आय गेमिंग मोड आणि डायनॉमिक रॅम एक्सपान्शन टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड