शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या हाती लागली जगातील सर्वात शक्तिशाली चिप! २ नॅनोमीटर, क्वालकॉमने बनविली; अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:33 IST

Qualcomm 2nm chip designed in India: भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रात क्रांती! क्वालकॉमने भारतात विकसित केली प्रगत २ नॅनोमीटर चिप. सविस्तर माहिती वाचा.

बेंगळुरू: भारताच्या सेमीकंडक्टर मोहिमेला आज एक मोठे यश मिळाले आहे. अमेरिकन चिप निर्माता कंपनी क्वालकॉमने भारतात विकसित केलेल्या आपल्या पहिल्या २ नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचे 'टेप-आउट' यशस्वीपणे पूर्ण केले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू येथील क्वालकॉमच्या केंद्राला भेट दिली आणि भारताच्या या तांत्रिक प्रगतीचे कौतुक केले.

काय आहे 'टेप-आउट' आणि २ नॅनोमीटर चिप? 'टेप-आउट' हा चिप डिझाइनिंग प्रक्रियेतील अंतिम टप्पा असतो, ज्यानंतर ती प्रत्यक्ष उत्पादनासाठी पाठवली जाते. ही २ नॅनोमीटर चिप जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानापैकी एक आहे. या छोट्याशा चिपमध्ये सुमारे २० ते ३० अब्ज ट्रान्झिस्टर्स बसवण्यात आले आहेत.

भारतासाठी हे महत्त्वाचे का?

स्वदेशी डिझाइन: ही चिप पूर्णपणे क्वालकॉमच्या बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथील भारतीय अभियंत्यांनी डिझाइन केली आहे. या चिपचा वापर एआय कॉम्प्युटर्स, स्मार्टफोन, ऑटोमोबाईल, रेल्वे, विमाने आणि अगदी अंतराळातील उपग्रहांमध्ये केला जाईल.

बॅक-ऑफिस ते डिझाइन हबमंत्री वैष्णव म्हणाले की, "भारत आता केवळ असेंबली हब राहिला नसून, कोअर इंटलेक्चुअल प्रॉपर्टी निर्मितीमध्ये जागतिक नेता बनत आहे." याच कार्यक्रमात अश्विनी वैष्णव यांनी 'सेमिकॉन २.०' चा रोडमॅप देखील मांडला. भारताने गेल्या चार वर्षांत ६७,००० सेमीकंडक्टर इंजिनिअर्सना प्रशिक्षित केले आहे, जे जगातील १ दशलक्ष टॅलेंटची कमतरता भरून काढण्यासाठी सज्ज आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : India Achieves Semiconductor Milestone: Qualcomm's 2nm Chip a Reality!

Web Summary : Qualcomm successfully 'taped-out' its first 2nm semiconductor chip designed in India. This chip, with billions of transistors, will power AI, smartphones, and aerospace. India is becoming a core IP creator, training engineers to meet global talent needs.
टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स