शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

भारतीय लाँचपूर्वी Samsung Galaxy A22 5G ची किंमत लीक; 19,999 रुपयांमध्ये होऊ शकतो सादर 

By सिद्धेश जाधव | Updated: July 19, 2021 12:49 IST

Samsung Galaxy A22 5G Prices: Samsung Galaxy A22 5G च्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये असू शकते.  

Samsung लवकरच भारतातील 5G स्मार्टफोनचा पोर्टफोलिओ वाढवणार आहे. कंपनी भारतात Samsung Galaxy A22 स्मार्टफोनचा 5G मॉडेल करण्याची तयारी करत आहे. सॅमसंग Galaxy A22 5G स्मार्टफोन पुढल्या महिन्यात भारतात दाखल होऊ शकतो. आता लाँचपूर्वीच या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला आहे.  (Samsung Galaxy A22 5G Prices Reportedly Leaked Online Ahead of India Launch)

91Mobiles ने Samsung Galaxy A22 5G च्या किंमतीची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. Samsung Galaxy A22 5G चा 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तर फोनच्या 8GB रॅम + 128GB मॉडेलची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात येईल. हा फोन गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता, त्यामुळे Samsung Galaxy A22 5G च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे.  

Samsung Galaxy A22 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy A22 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Dimensity 700 5G SoC सह बाजारात दाखल झाला आहे. या सोबत 8GB पर्यंतचा रॅम 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 11 आधारित वन युआय 3.0 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A22 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.   

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड